Back to Book Details Report Reviews

एका थेंबाची आस

वादळ उठले उरी,
झाली आठवण जुनी;
आभाळात घर तुझे,
उडता येत नाही मला,
पंख असुनी.

रोज रात्री स्वप्नात भेट तुझी,
विसरू कसा मी साथ तुझी;
तहानलेला चकोर मी,
एका थेंबाची आस मनी.

शोधले तुला आकाश, पातळ, 

डोंगर-दरी,
किती साहिल्या यातना,
नशिबी नाही भेट तरी;
कधी विसावतो क्षणभर,
तू भेटली होतीस ज्या ठिकाणी.

केलेल्या प्रेमाचे चीज झाले पाहिजे,
प्रतीक्षा खूप झाली, आता तू आले पाहिजे;
पंखांना बळ मिळावे, घेण्यास भरारी गगनी.

आभाळात घर तुझे, 

उडता येत नाही मला पंख असुनी.


प्रविण ज्यो. तायडे 

अमरावती 

Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu