पाऊस
धुक्याचे पांगरून आणि डोईवर घाटमाथा
सरीं देती आलिंगन पावसाचे गीत गाता गाता
कधी सूर्य देई दर्शन कधी लपे ढगा मागे
पाठशिवाणीचा हा खेळ बघून,मनात उत्साह तो जागे
इंद्रधनुच्या रंगात पशुपक्षी जाती सामावून
हिरव्यागार तृणांकुरावरती दवबिंदू गोफती मोतीयांचे हार
हात घेता तुझा हाती मझं कळेना कोणता प्रहर
या धुंद पावसाळी वातावरणात प्रीतीस येईल बहर
@नयना
