मन एक वेडे पाखरू
मनात फार येत की तुझ्यासोबत
खूप साऱ्या गोष्टी करू
बागेत उमललेली फुल गोंजारु
रंगीबेरंगी फुलपाखर धरू
समुद्रकिनारी वाळूची घरं करू
पौर्णिमेच्या रात्री चांदण्याची शाल पांघरू
तुझा हात हाती धरून नवनवीन वाटा धुंडाळू
थोडं माझ्या मनातलं सांगून
तुझं खूप काही साठवून घेऊ
पण परत मनात विचार येतो
मनाचं ते काय?
मन तर एक वेडं पाखरू..
@ नयना
