असेन मी नसेन मी
असेन मी, नसेन मी,
जरी नसेल हे अस्तित्वही...
सदैव श्वासात तुझ्या वसेन मी,
बनून एक आठवण निखळ अनामशी...
म्हणूनच... अश्रू पुसून हे नयनांचे,
आयुष्य आनंदाने सजवायचे...
जोवर येत नाही मी परतून,
तोवर स्वतःला प्रेमाने जपायचे...
मी परतून येईन... नक्कीच येईन,
कालचक्राचे सगळे बंध तोडून,
एकदा तुला घट्ट मिठीत घेण्यासाठी,
आणि पुन्हा कायमची तुझीच होण्यासाठी!
@नयना
