तू नसताना
तू नसताना माझे शब्द मला
गोंजारतात, माझ्याभोवती फेर धरून नाचतात
त्यांच्या बांधलेल्या हिंदोळ्यावरती मी मनसोक्त झुलते आणि नवीन नवीन रचनांमध्ये स्वतःला बांधून घेते
पण तू आलास की मात्र
माझे शब्दच हरवतात आणि
कुठेतरी माझ्यातच दडून बसतात
मला बोलायचं बरच काही असतं पण
ते असे काही लाजतात की
मला पूर्णपणे मूक बनवून टाकतात..
@नयना
