एकदाचा निरोप त्याला
स्नेह हृदयाने त्याला निरोप द्यावा,
संग चालण्यास नकार ज्याचा;
नको ती व्यर्थ बडबड, नको ती ओढाताणी,
त्याला सोडून देणे नेहमी चांगले,
जुळत नाही विचार ज्याचा.
नेहमीच क्रोध आणि रुसणे-फुगणे,
दूर जाण्याचे नित्य नवे बहाणे;
धोक्याचे असते असे नाते टिकवणे,
वेळेतच करावा अस्वीकार त्याचा.
निरोप देताना, डोळ्यात अश्रू नसावे,
निर्णयावर ठाम असावे, नंतर त्याचे दुःख नसावे;
स्वतःवरच प्रेम करावे,
मग जीवनात नसावा पुन्हा संचार त्याचा.
नात्यात स्नेह उरला नाही, तेथे सक्तीचे कारण काय?
स्वतःसाठी योग्य निर्णय घ्यावा,
वाट पाहण्याचे कारण काय?
एकदाचा द्यावा निरोप त्याला,
पुन्हा शोधू नये आधार त्याचा.
स्नेह हृदयाने त्याला निरोप द्यावा,
संग चालण्यास नकार ज्याचा
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
