Back to Book Details Report Reviews

खंजर पाठीशी

तू हसत होतीस दूर जाताना,
तेव्हा मी सांभाळत होतो,
धारा आसवांच्या;
तू खंजर पाठीशी लपवत होती,
तेव्हा हसत होत्या जखमा, 

माझ्या काळजाच्या.

मला कळले कसे नाही,
गुपित चेहऱ्या मागचे तुझ्या,
विश्वास ठेवला जीवापाड,
आणि वाहत राहिलो मी,
धारेत भावनेच्या.

मी प्रतिकार केला असता,
तू कापताना गळा माझा.
पण प्रेम समजून सहन केल्या,
मी प्रत्येक यातना
विश्वासाच्या.

उगाच नको फसू देऊ,
डाव तुझ्या त्या योजनेचा,
जखमी तुझ्या हातून मी,
तरी नाव तुझं,
ठोक्यात काळजाच्या.

तू हसत होतीस दूर जाताना,
तेव्हा मी सांभाळत होतो, 

धारा आसवांच्या.

प्रविण ज्यो. तायडे
अमरावती

Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu