तुझ्या श्वासात मी उरावा
मी तुझाच सखे जन्मोजन्मीचा,
याचा काय देऊ पुरावा,
संपावे सारे अस्तित्व माझे,
तुझ्या श्वासात मी उरावा.
भटकून जगलो कित्येक वाटा,
गवसले काहीच नाही.
घराजवळ येता तुझ्या,
प्रवास अखेरचा ठरावा.
शोध पुढचा घडीभर थांबावा,
तुझ्या बाहुपाशी विसावा,
तुझ्याच गावात मुक्काम माझा,
आणि मी पुढचा रस्ता भुलावा.
तुझ्या प्रेमात हरवून जावे,
अंतिम श्वास तुझ्याच संगतीत असावा.
जन्म पुन्हा जर लाभला मला,
तुझ्याच शेजारी जन्म घ्यावा.
भेटला नवीन जन्म,
आणि विसरलो जर कदाचित तुला,
तुझ्या स्पर्शाने पुन्हा जाणीव व्हावी,
हरवलेला मी, पुन्हा तुझ्यातच सापडावा.
संपावे सारे अस्तित्व माझे,
तुझ्या श्वासात मी उरावा.
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
