Back to Book Details Report Reviews

जन्मोजन्मीचा सोबती

झालो तुझ्या सवयीचा मी,
नको सोबतीला आता कुणी;
असली जरी कितीही संपदा,
तरी जीवनवाट तुझ्याविना सुनी.

किती जन्मांचा सोबती आहे मी,
तू किती युगांपासून बसली मनी;
निसर्ग तुझ्यात दिसतो, 

अशी बसली तू माझ्या नयनी.

तुझ्याविना हे क्षण सारे,
अधुरे वाटती मला;
तू दूर असलीस तरीही,
भास तुझाच मला रातदिनी.

श्वासात तुझीच ओढ असे,
जन्मोजन्मीची आस तुझी;
हृदयात जपून ठेवली मी,
आजही ती आठवण जुनी.

झालो तुझ्या सवयीचा मी,
नको सोबतीला आता कुणी.

— कवी प्रविण ज्यो. तायडे

Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu