Back to Book Details Report Reviews

जुन्या पत्यावर

सांगत होती जगभर,
नाव तुझे कोरले आहे
मनावर;
मग असे काय झाले,
बनुनी वैरी उठलीस माझ्या जीवावर?

जगलो असेही आपण,
ना दुरावलो कधी क्षणभर;
प्रसिद्धी अशीही एकेकाळी,
चर्चा असायची गावच्या पारावर.

कुणी घेत नाही माझे नाव,
आज त्याच गावच्या पारावर;
तुझ्या आठवणी विरून गेल्या,
पण विरहाचा घाव ताजा अजूनही काळजावर.

संवाद संपला सारा,
भेटही हल्ली होत नाही;
पण रोज लिहितो एक पत्र,
आणि पाठवून देतो तुझ्या जुन्या पत्त्यावर.

अधूनमधून नजरा भिडत असतात,
पण पावले पडत नाही दारावर.
सांगत होती जगभर,
नाव तुझे कोरले आहे मनावर.

प्रविण ज्यो. तायडे
अमरावती

Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu