माझ्या मृत्यूचा निरोप
माझ्या मृत्यूचा निरोप तिला,
थोडा लवकर कळू द्या;
खूप दिवसांची दुःखी ती,
ओठांवर तिच्या,
थोडं हसू उमळू द्या.
आलीच जर का ती,
मरणावर माझ्या,
तिलाही एक फूल वाहू द्या.
झाकू नका चेहरा माझा,
मन भरून तिला पाहू द्या.
डोळ्यांत नसेल अश्रू तिच्या,
पण तिलाही थोडं रडू द्या. चंदनाची चिता नको,
तिने जमवलेल्या लाकडातच,
माझा देह जळू द्या.
संपले जीवन, झालो राख मी,
हे तिला कळू द्या;
थोडी चितेची राख माझी,
तिच्या वाटेत पडू द्या.
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
