Back to Book Details Report Reviews

प्रेमाच्या भ्रमात मी


असलो जरी तुझ्या प्रेमाच्या भ्रमात मी,
तूही जाणतेस सखे, तुझ्या मनात मी.

धरले कितीही तू मौन जरी,
दिसतो तुझ्या डोळ्यांच्या भाषेत मी.

तू सांगतेस, रात्री झोप गाढ येते,
पण असतो तुझ्या सकाळच्या स्वप्नात मी.

नसलो जरी मी आठवणीत तुझ्या,
तरी सदैव उभा असेन, तुझ्या दुःखात मी.

असलो जरी तुझ्या प्रेमाच्या भ्रमात मी,
कुठेतरी अजूनही आहे तुझ्या मनात मी.

प्रविण ज्यो. तायडे
अमरावती

Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu