Back to Book Details Report Reviews

तुझी आठवण

तुझ्या आठवणीने जर का ऊर भरून आला,
तेव्हा पाऊस पडावा,
आणि डोळ्यांचा ओलावा
त्यातच विरून जावा.

श्रावणाचा गार वारा अंगावर येता,
त्याच्या बहाण्याने तुझा स्पर्श व्हावा;
मनाच्या कोऱ्या पानांवर अलगद,
तुझ्या आठवणींचा गंध दरवळावा.

हिरव्या साडीत तू मिलनास यावी,
ओठांवरती हळूच लाज खुलावी;
आणि अंबर-धरतीच्या मिलनाचा,
क्षितिजाने साक्षीदार व्हावा.

तू जवळ असावी, पाऊस बरसावा,
प्रत्येक थेंबात तुझाच भास व्हावा;
संपून जावा विरहाचा हा ऋतू,
आणि जन्मोजन्मीचा सहवास लाभावा.

प्रविण ज्यो. तायडे
अमरावती

Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu