तुला टाळता येत नाही
टाळून बघितले कितीदा मी,
पण तुला टाळता येत नाही;
केले खूप प्रयत्न एकटा राहण्याचे,
पण स्वतःला तुझ्याविना सांभाळता येत नाही.
कंटाळा येतो कधी कधी,
जीवनातील नैराश्याचा,
पण तुझ्या प्रेमापोटी सखे,
हा संसार सोडता येत नाही.
तू बोलून, रडून भावना
मनातल्या व्यक्त करू शकतेस;
बोलायचे खूप असते मला,
पण मनातले बोलता येत नाही.
दूर जाण्याचे ठरवतो कितीदा,
पाऊल मात्र पुढे पडत नाही;
मन म्हणते विसरून जावे तुला,
पण हृदयाला तू विसरता येत नाही.
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
