Back to Book Details Report Reviews

अंधाराचे साम्राज्य

किती जाळे विणले विचारांचे,
बंद झाले रस्ते परतण्याचे;
प्रकाशाच्या शोधात मी,
उभे केले साम्राज्य अंधाराचे.

झिजून गेला देह सारा,
आणि राहून गेले जे होते करायचे;
बाभळीचे काटेही होता आले नाही,
किती झिजावे बनुनी झाड चंदनाचे.

स्वप्नपूर्तीसाठी शिरी
भार वाहिला आभाळाचा;
आयुष्यभर उजेड शोधत राहिलो,
पण नशिबी आले दिवस अंधाराचे.

आपलेच आता दूर झाले,
फिरकत नाहीत आता घराकडे;
तेच हरवले आज काळाच्या वाटे.
जे क्षणभरही दूर नव्हते राहायचे,

ज्यांच्यासाठी आयुष्य सारे,
हसत हसत केले स्वतःचे वारे;
शेवटी उरलो एकटाच मी,
आणि सोबतीला हे साम्राज्य अंधाराचे.

प्रविण ज्यो. तायडे
अमरावती

Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu