Back to Book Details Report Reviews

काळ उभा समोर आहे

काय मागू अजून मी, काळ उभा समोर आहे,
संपल्या सर्व इच्छा, सरता माझा सफर आहे.


केला जीवनभर धिंगाणा, मानकरी मी आता,
पण मलाच माहीत, किती मी लोफर आहे.


टाळ्या मिळाल्या जगाच्या, मन मात्र रिकामे राहिले,
शक्तिशाली मी जगासाठी,
पण मलाच माहित मी किती कमजोर आहे.


चेहऱ्यावर हसू ठेवले, डोळ्यांत दडला कहर आहे,
हिशेब केला आयुष्याचा, अजून किती उधार आहे.


ज्यांना दुखावले कधी, त्यांची आठवण येते आता,
हातात काही उरले नाही, अंधार घनघोर आहे.


उद्याची आस नाही आता, आजच शेवटचा स्वर आहे,
काय मागू अजून मी, काळ उभा समोर आहे.


प्रविण ज्यो. तायडे 

अमरावती 

Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu