... आणि जगायचं मात्र राहून गेलं
…आणि जगायचं मात्र राहून गेलं
प्रस्तुत कविता ही माणसाच्या जीवनाची शोकांतिका मांडली आहे.
सगळे म्हणता बालपणीचा काळ सुखाचा
आणि हातात मात्र खेळण्या ऐवजी कोरी पाटी देतात
खेळण्या बागडण्याच्या वयात अभ्यासाचा ससेमीरा लावतात आणि मग
पाटी वरच्या रेघोटयांमध्ये भविष्याच्या पाऊलखुणा स्पष्टच दिसायला लागतात
अभ्यास कर ,अभ्यास कर म्हणत सगळे कसे मागे लागतात
अशातच कसबस शाळेचं लाईफ मात्र संपायला लागत
बालपणाचा काळ संपला असं वाटायला लागत
आणि खरंच बालपण जगायचं मात्र राहून गेलं असं वाटायला लागत
म्हटलं आता तरी सुटका होईल
कसलं काय आताकूठे कॉलेज लाईफ सुरु झालं
नुसता अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास
ह्या सगळ्या गोंधळात मात्र कॉलेज लाईफ अनुभवायचं राहून गेलं
आणि जगायचं मात्र राहून गेलं
म्हटलं पदवी मिळविली शिक्षण झालं
संपलं बाबा एकदाच अभ्यासाचं रडगाणं
असं म्हणत सुस्कारा सोडला खरा पण तोवर थोडी संपतंय जीवन गाणं
आता मात्र कहर झाला
करियर, पैसा, जबाबदाऱ्या याच चित्र स्पष्टच दिसायला लागलं
आणि शिफ्ट ड्युटीच लचाण मात्र मागे लागलं
पैसा, पैसा करत सगळे कसे धावायला लागले
आणि यातच जगायचं मात्र राहून गेलं
सगळ्यांचे होतात तसे दोनाचे चार हात झाले
आणि बघता बघता सोनपावलांनी या गोजिरवाण्या घरात सानुल्याचे आगमन झाले
आणि घरात नवचैतन्य बहरले
पण रोजच्या धावपळीत घरच्यांना वेळ देणं मात्र कठीण झाले
बघता बघता नोकरी, मुलं, शिक्षण, लग्न जबाबदाऱ्या वाढत गेल्या
आणि सारं करता करता जगायचं मात्र राहून गेलं
या सगळ्यात एक मात्र खर आरोग्याची हेळसांड झाली
मग काय योगा, व्यायाम याची मात्र आठवण झाली
आता आठवून काय उपयोग आधीच सगळे दुखणे मागे लागले
बीपी, शुगर, सारे आजार सोबतीला आले
आणि मग काय हळू हळू जगण्यातला आनंद हरवून गेला
आता जाणवू लागलं स्वतःसाठी वेळ द्यायचं मात्र राहून गेलं
जीवनात जे करायचं होत ते झालं नाही
आणि जे करायचं नव्हतं तेच मात्र नशिबी आलं
यातच जीवनाचं समाधान हरवून गेलं
आणि या सगळ्यात जगण मात्र राहून गेलं
नोकरीं, प्रोमोशन, डेसिग्नेशन यात बँकेचा बॅलन्स वाढत गेला
नात्यांमधला समतोल मात्र ढासळत गेला
आणि मग वाटायला लागलं नात्यांना वेळ द्यायचं मात्र राहून गेलं
हे सुद्धा तेव्हढंच खरं जगण्याच्या नादात,आईवडीलांकडे दुर्लक्ष झालं
आणि आपल्या माणसात जगायचं मात्र राहून गेलं
वेळेच्या हिंदोळ्यावर स्वप्नांच्या बाजारात सुख, दुःख, आशा अपेक्षा वाहून गेल्या
जगण्याचा अर्थ शोधता शोधता खर आयुष्य मात्र जगायचं राहून गेलं
आता मात्र सगळं सोडा
उरले सुरले दिवस स्वतःला वेळ देत जा
आणि जगण्यातला आंनद मिळवत जा
आणि मग म्हणा हेच काय ते जगायचं राहून गेलं होत ते मनासारखं जगून घ्या
आयुष्याच्या शेवटी जगण्याचा अर्थ कळाला
देव शोधण्यात मंदिरं, अवघा संसार पालथा घातला
पण खरा देव माणसात आहे हे कळायला अख्ख आयुष्य वाया घातलं
आणि मग आयुष्य जगायचं मात्र राहून गेलं
हे माझं ते माझं करता करता आयुष्य संपत आलं
पण आयुष्याचा अर्थ कळता कळता उशिरा कळाल
आणि माणूस म्हणून जगायचं मात्र राहून गेलं
लेखन- ललित ज्ञानेश्वर पाटील , पुणे
