Back to Book Details Report Reviews

तू सारथी असावी

बेफिकीर वागणे जरी,
गुंतलो असतो तुझ्यात सदा,
भटकंती नजरा जरी,
असतेस तरी तू हृदयात सदा.

शब्द नि:शब्द तुझ्याच साठी,
माझ्या लेखणीचा,
राजा मी तुझा,
आणि गुलामही तुझ्या दावणीचा.

प्रेम माझे मृगजळ नाही,
व्यक्त करावा भाव कसा?
उमलेना तुझ्या प्रेमाची फुले,
मग मी घ्यावा ठाव कसा?

माझ्या प्रीतीची तुळस
तुझ्या हृदयाच्या अंगणात असावी,
घ्यावी झेप प्रेमरथाने,
आणि त्या रथाची तू सारथी असावी.

प्रविण ज्यो. तायडे
अमरावती

Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu