किती अजून?
आयुष्याने छळावे किती अजून
किती उरला असेल वेळ अजून
लपंडाव सुखदुःखाचा
विरहाचा आणि मिलनाचा
किती उरला
बाहुल्यांचा खेळ अजून.
पाऊलपावलावर प्रश्न उभा,
उत्तरा साठी
किती भटकंती अजून
मनाला शांती नाही,
किती उरला
संघर्षाचा काळ अजून
हरवले किती, मिळवले किती,
हिशेब मांडावा तरी किती;
ओंजळीतून निसटलेल्या सुखाचा,
कधी जुळेल
जीवनाशी मेळ अजून?
तुझ्या भावना जपतोस अहंकाराने,
माझी भावना
तुझ्यासाठी खेळ अजून
तू स्वतःला मुक्त समजतो,
मग मीच का जपावी
तुझ्या नावाची माळ अजून
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
