Back to Book Details Report Reviews

ग्राहक मी दुःखाचा

सवलत द्यावी अशी 

तुझ्याकडून अपेक्षा आहे,
हे दुःखा, 

मी तुझा रोजचा ग्राहक आहे!

जन्माचा सोबती माझा,
असतोस नेहमीच संगतीला,
थोडा तरी विचार कर माझा,
मी तुझा लंगोटी यार आहे!

किती काळ सोबत राहणार,
किती हिशेब माझ्या माथी मांडणार?
कधी तरी सुखाचीही पाळी येऊ दे,
नंतर तुझ्या मैत्रीचा आधार आहे.

मलाच निवडावे या गर्दीतून,
किती अचूक तुझी पारख आहे!
सुखाच्या बाजारात हरवतो मी,
तुझ्या दुकानात मात्र माझीच वर्दळ आहे!


प्रविण ज्यो. तायडे
अमरावती

Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu