मरण म्हणजे काय
काय असते मरण?
श्वास थांबला, हालचाल थांबली, डोळे मिटले… यालाच मरण म्हणतात काय?
की एखादा माणूस गेला,
त्याच्यासोबत एक विचार गेला,
एक अनुभव गेला,
जगण्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन गेला… याला मरण म्हणतात काय?
घराचा आधार हरपने,
जबाबदाऱ्यांचा भार पेलणारे खांदे हरवने,
कुटुंबाचा कणा मोडने,
कित्येक स्वप्नांचा आधारच निघून जाणे… याला मरण म्हणतात काय?
जर यालाच मरण म्हणत असतील, तर मरण इतकं सोपं नसतं…
कारण माणूस एकदाच मरतो, पण त्याच्या जाण्याने अनेकांची आयुष्यं बदलून जातात.
त्याचा आवाज शांत होतो, पण आठवणी बोलत राहतात…
म्हणूनच…
मरण म्हणजे केवळ एका श्वासाचा अंत नसतो, तर अनेक नात्यांच्या जगण्याला बसलेला धक्का असतो.
कारण…
एका माणसाच्या जाण्याने फक्त एक आयुष्य संपत नाही, तर त्याच्यासोबत जोडलेली अनेक आयुष्यं बदलून जातात…
एका माणसाच्या जाण्याने एक युग संपतं! 💐
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
