Back to Book Details Report Reviews

पुन्हा तो योग नाही

एकदाच का साथ सुटला,
मग तो अनंतासाठी हरपला…
पुन्हा कधी भेटणे नाही,
पुन्हा तो योग नाही…
शेवटी शून्य उरते,
एकदा का हा देह विखुरला!

पुनर्जन्म नाही, पुनर्मिलन नाही,
मृत्यूपलीकडे ठाव नाही…
प्रकाशापलीकडे अंधार सारा,
डोळे मिटताच थांबते
जीवनाची वाहती धारा…
माघारी वळणे नाही,
एकदाचा का
निसर्गाने जीव हिरावला.

जिवंतपणी जप नाती,
मनमोकळ्या कर गाठी…
रुसवे-फुगवे विसरून जा,
प्रेमाचे दोन शब्द बोलून जा…
भरणार नाही जागा त्याची
एकदाचा का माणूस हरवला.

संगतीत आज जगून घे,
प्रत्येक क्षणात प्रेम भरून घे…
साथ नाही, पुन्हा भेट नाही,
उरेल केवळ आठवणी…
पुन्हा तो योग नाही
एकदाचा का स्पर्श गमावला,🙏


प्रविण ज्यो. तायडे
अमरावती

Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu