पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मौन तू नी मी

मौन तू आणि मौन मी,
तरी वारा वाहतो आहे
तुझ्या न माझ्या भावनांना तो वाट दावतो आहे..

मौन तू आणि मौन मी,
सांजवेळ ढळते आहे
क्षितिजा वर पसरलेल्या रंगामध्ये ती रंगते आहे..

मौन तू आणि मौन मी,
समुद्रावर लाट उसळते आहे
आठवणींशी पाठशिवणीचा खेळ ती खेळते आहे..

मौन तू आणि मौन मी,
रात चांदणी चमचमते आहे
चंद्राच्या शीतल प्रकाशात प्रीत आपुली बहरते आहे..

जरी मौन तू आणि मौन मी,
शब्दाविना संवाद आपुला घडतो आहे
मनाची मनाशी जुळता तार,
प्रेम राग त्यातून निनादत आहे..


@नयना

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू