पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आई म्हणुनी....

आई म्हणुनी घेण्यास चुकले मी का सदैव?



आई म्हणुनी घेण्यास, चुकले मी का सदैव?

नाही उपकार केले, तुला जन्मास मी घातले . 

ठाव असे मज अंतरी, कळीचे ते फूल होते; 

फुलास न ठावे परी ते, जन्मास कसे आले ? !!१!!


जन्मा येई या धरा , जोजवले हाती झुला; 

रात्रंदिन जागी आई, पान्हा देई तुझ्या मुखा. 

कर्तव्य होती करीत , न उपकार कुणासाठी; 

किती ही बोल लावा, तरी घेई ती पदरी चुका!!२!!


मुलगी बनून आली , माझ्या दारी तुझ्यासवे; 

माप ओलांडिता , घरची बनुनी एक झाली. 

लाड-कौतुक झाले, वर्षामागून वर्ष सरली; 

वेलीवर सुंदर फुल आले, आई जड झाली. !!३!!


आईचा मुलगा,असतो नवरा बायकोचा; 

जन रीतीचा प्रवास, असतो हा अनोखा! 

खरे-खोटे काय कसे, निस्तारता येत नसे; 

सत्यता दुर्लक्षील तू, होई कसा सलोखा? !!४!!


दुखावली माय जरी, पाचपोस ना कुणास; 

भाळी लिहितो विधाता, न कळे तेच दुर्दैव. 

मागील चुका पाहुनी, शहाणा न होई कदा; 

आई म्हणुनी घेण्यास, चुकले मी का सदैव? !!५!!

...........................................................



©पल्लवी उमेश 

जयसिंगपूर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू