पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

एकाकी

लिहिण्याजोगे खूप काही आहे,
पण लिहू तर किती नी काय काय लिहू...

सुखाच्या माळेत गुंफलेली पण अपूर्ण राहिलेले स्वप्ने लिहू,
की जवळ भासली तरी विखुरलेली माणसे लिहू...

जे आपले असूनही आपले राहिले नाहीत,
त्या अवांछित नात्यांचा हिशोब लिहू...

की मग त्या अस्वस्थ रात्रींचा,
जिवघेणा न संपणारा प्रवास लिहू...

जी उदासिनता शब्दात मांडू शकले नाही,
ते विरहाचं दुःख लिहू...

की चेहऱ्यावर चढवलेल्या त्या
हास्याच्या मुखवटाच्या पाठीमागे असलेली
संपूर्ण एकाकीपणाची व्यथा नी कथा लिहू...


@नयना 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू