पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मृगजळ

मृगजळ... 

रणरणत्या वाळवंटातला एक छलावा,
मन ज्याच्या मागे धावतं,
असा हा भुलावा...

कधीही न गवसणारा एक कवडसा,
तरीही कधीतरी हाती येईल, हाच तो भरवसा!

स्वतःकडे ओढून घेणारा तो एक चकवा ,
क्षणभंगुर सुखासाठी त्याच्या, जीवही लागतो मुकावा.


तहानेलेल्या मातीला, तृप्तीच्या आभासाची आस,
कधी मंद कधी तेज, सुरूच राहतो श्वासांचा प्रवास.

त्याला जिंकण्याच्या हट्टापायी, माणूस घेतो वेड्या 

आशेसह सतत धाव,
आज ना उद्या नक्कीच गवसेल, त्या मृगजळाचा ठाव!


@नयना 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू