त्या वळणावर
अंधार घनघोर आहे आणि त्यात वाट चुकलेली,
अनंताचा प्रवास माझा, पावले सारी थकलेली...
लिहिण्यास खूप काही आहे, पण लेखणी शब्दांस मुकलेली,
ओळखू कसा मी आपले आणि परके,
सर्वच माणसे स्वार्थाच्या रंगात रंगलेली...
कसा कोसळू, रिकामा ढग मी आकाशातला
मी माळी उजाड सुमनांच्या बागेतला,
कसा दरवळेल सुगंध जीवनात,
जेव्हा प्रेमाची फुले सारी सुकलेली...
पार करण्यास हा अथांग सागर,
मला आता जमणार नाही;
मी त्या वळणावर अजूनही उभा,
आणि माझी सखीआहे रुसून बसलेली...
का ना घ्यावी मी झेप आकाशी,
नव्या पहाटेची आस धरलेली,
खुणावते मला ती चांदणी,
गालात हसलेली...
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
