तुझ्यात गुंतलो
भाव मनातला, समजेना कसा व्यक्त करावा,
तुझ्यात गुंतलो असा, जसा श्वास देहात विरावा;
तुझ्याविना ओसाड वाटे, हिरवा ऋतूही कोमेजावा,
स्वप्न उराशी एकच, नेहमी तुझा चेहरा दिसावा;
हृदय तुझ्याविना माझे, जसा मासा पाण्याविना तळमळावा,
तुझ्यावर प्रेम अफाट असे की, निळा असमान कमी पडावा.
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
