एकटे
माणसांच्या गर्दीत असूनही,
किती एकटे आहोत आपण..
मनात हजारो गोष्टींची किलबिल,
पण शांत राहतो आपण..
भरून येता डोळे,
अलगत नजर चुकवतो आपण..
दुःखावर घालता कोणी जराशीही फु़ंकर,
हलकेच हसतो आपण..
@नयना
माणसांच्या गर्दीत असूनही,
किती एकटे आहोत आपण..
मनात हजारो गोष्टींची किलबिल,
पण शांत राहतो आपण..
भरून येता डोळे,
अलगत नजर चुकवतो आपण..
दुःखावर घालता कोणी जराशीही फु़ंकर,
हलकेच हसतो आपण..
@नयना