ठेच लागत असते
ठेच लागत असते चालताना, वाटा अशाही काही असतात,
नसतात सर्वच फुले कोमल, काहींना काटे सुद्धा असतात.
घाव झाले मनावर तर चौकशी नको,
मनाला जखमा देणारे आपलेच असतात.
कितीही सांभाळा घरट्यात पिलांना,
पंख आले की दूर उडून जातात.
जीवनाच्या वाटेवर कितीही जपा नाती,
काही नाती काळाच्या ओघात सुटून जातात.
जीवनाच्या वाटेवर भेटतात कितीतरी,
पण मनाच्या घरात मोजकीच माणसे राहतात;
नाव गोंदले हातावर ज्याचे,
कधी कधी ते नशिबात नसतात.
म्हणूनच काहीजण विसरून जातात,
आणि काही आठवणीत कायम राहतात.
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
