प्रतिभेचे समर्पण ©️ हसरा चंद्र
प्रतिभेचे समर्पण
©️ हसरा चंद्र
ती आता बोलतही नाही कुणाशी
पण तिचा अबोलाही नाही कुणाशी
श्वासात वार झेलला असावा तिने
जखम खोलच झाली असावी उराशी
तिला कुणीच समजून घेतले नाही
हळवी होतीच कळीसम ती जराशी
वेदनेला गात फिरायचे नव्हते
तरी नाते जपलेले तिने जगाशी
सोसण्यात सरलेली बारा वर्षे
लेवून कृष्ण माळ ती आली घराशी
हासा, तुझी लेखणी अता बहरू दे
अर्पून राधेच्या प्रियाच्या पदाशी
प्रतिभे, हक्क माझा तुझ्यावर नाही
दिली ज्याने लागो त्याच्या चरणाशी
