मावळणाऱ्या रवी
मावळणाऱ्या रवी,
तुझे तेज प्रखर आहे,
सरत्या काळातही तुझे
प्रेम अपार आहे.
उमलू दे तिच्याही मनात
तुझी ती किरणे,
हृदयाच्या क्षितिजावर
अजूनही अंधार आहे.
घन दाटून आले अवकाशी,
बरसू दे जलधारा;
नाचण्यास मोर कधीचा
आतुर आहे.
मीही गायिली असती
जीवनाची मधुर गाणी,
पण माझी मैना
खूप दूर आहे...
दिनकरा, एकटे राहण्याची
सवय तुला असेल,
मी कसा एकटा राहू?
तिच्याविना जगणे
मला अस्वीकार आहे.
प्रविण ज्यो. तायडे
अमरावती
