पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

निरोप

आली वेळ निरोपाची, दाटले डोळ्यांत पाणी,
बाप्पा तुझ्या विरहाने, अवस्था होईल केविलवाणी..

मोदक-लाडूंची ती आरास
दहा दिवसांचा दिव्य संग,
पाहूनी तुझे विलोभनीय रुप सुरेख,भजनात होती भक्त दंग..

तुझ्या पवित्र सान्निध्याने
घडे एकजुटीचा सुंदर मेळ,
विसरून रात्र अन् दिवस, उल्हासात जाई सारा काळ..


चौदा कलांचा तू अधिपती,
आम्हां पामरावर सदैव तुझी प्रीती,
देऊन सुबुद्धी, घडविशी आमुची प्रगती..


कृपाहस्त तुझा राहो सदा
हेच मागणे तव चरणाशी,
चूक-भूल देवा घ्यावी पदरात, यावे पुनश्च परतुनी आगामी वर्षात 🙏🙏


@नयना 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू