पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गझल

गझल

आलेल्या प्रत्येक अनुभवाचे भान आहे,
प्रत्येकाने दिलेला मज मान आहे.

घेतला आहे मनावर ताण आता,
अर्थ ध्यानी घेता होतो बाण आहे.

मोजता ही उंची वय तर लहान आहे,
येणाऱ्या अनुभवाचे मज भान आहे.

विश्व हे सुखदुःखाचे एक गान आहे,
या सुरेख संगमावरती ध्यान आहे.

या सुगंधी फुलांची मज आण आहे,
घराच्या प्रत्येक भिंतीलाही कान आहे.

अपेक्षांचे हिरवे पिंपळ पान आहे,
चैतालीवर केलेले आवसान आहे.

लेखिका 

©® चैताली वरघट 

अकोला 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू