पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अक्षर

अक्षर


कसे असावे आपुले अक्षर

जे घोटून घोटून व्हावे सुंदर

अन् वाचतच सर्व मित्रवर

विस्मय चकित व्हावे


गोलाकार, सरळ अन मोकळे

भासावे जणू नक्षीदार वेगळे

ओतीव साच्याचे ते रुपावळे

अक्षरांस सहज लाभावे


अक्षर मात्रा रेखाटन छान

लिहिताना त्याचा पैस सान

आकुर्ल्या वेलांट्यांचेही भान

उमटवताना नित्य असावे


अक्षरांचे सुस्पष्ट ठोसपण

कागदावर व्यक्त दडपण

निब ने एकलयीत प्रक्षेपण

हे ही सुयोग्य असावे


ओळींस ओळी न लागव्या

आकार उकार रुकार ल्याव्या

लंबाक्षरे कृती न बिघडाव्या

ऐसे अक्षर स्पर्श असावे


नेमकेच पटी लिहीत जावे

एकसुरीने टापटीप ठसावे

अगदी पूर्ण सुयोग्य

शब्दांतही अंतर असावे


अक्षर म्हणिजे परमेश्वर

नित्य रेखावे सूचक सुंदर

जणू दैवाचे ते श्लोक मंतर

लोकमान्य रुपी रुजवावे


(स्वयेश्री)

८८७९७६३६३९


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू