पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गजरा

*मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित उपक्रम*

आपल्या भाषेच्या साहित्याबद्दल व्यक्त होण्याची एक महत्त्वाची संधी..

21 फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन आहे तसेच 27 फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिन आहे. 

*'माझे आवडते मराठी पुस्तक'*

" गजरा" ( लालित लेख संग्रह )

सौ भारती भाईक 

 

२७ फ्रेबुवारी  " मराठी भाषा गौरव दिन "

कुसुमाग्रज म्हणजेच 

वि वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा दिवस आपण .

" मराठी भाषा गौरव दिन " म्हणुन साजरा करत असतो .. मराठी भाषेचा यथोचित गौरव व्हावा म्हणुन हा दिवस आपण साजरा करत असतो 

" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी '

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म  पंथ  जात एक मानतो मराठी

एवढया जगात माय मानतो मराठी.."

या निमित्याने मराठी भाषेवर किती प्रेम आहे हे व्यक्त करण्याचा दिन खर म्हणजे एका दिवसाच्या सोहळ्याने हवा तसा बदल होऊ शकत नाही मनात रुजली पाहिजे मराठी भाषा ..

खर पाहिल तर मराठी भाषा समृद्ध भाषा आहे .. गर्भश्रीमंत भाषा आहे अलंकाराने सजलेली भाषा आहे .. या मराठी भाषेचे दालन समृद्ध असे आहे याच मराठी भाषेत कितीतरी .. विपुल अस लेखन झाले आहे अनेक साहित्याची निर्मिती झाली आहे 

त्यात धार्मिक  अध्यात्मिक सामाजिक लेखसंग्रह कविता संग्रह कथा आणि ललित संग्रह असे अनेक प्रकारामध्ये विपुल प्रमाणात लेखन झालेले आहे किंबहुना सुरू आहे सहज वाचता वाचता एका पुस्तकाने लक्ष वेधून घेतले त्या पुस्तकाचे नाव आहे

 ललित लेख संग्रह सौ भारती भाईक यांचा " गजरा" हा ललित लेख संग्रह नुकताच वाचण्यात आला 

सदर संग्रह " शॉपीजन" ने प्रकाशित केला आहे ..

पुस्तक अनेक प्रकाशित होत असतात पण काही संग्रह बघीतले कि पहिल्याच नजरेत आपण प्रेमात पडतो ना  अगदि तसे झाले आहे म्हणतात ना 

" लव्ह ॲट फर्स्ट साईड" अगदी तसच काहीस झाल कारण सुंदरस अस ज्याला आपण आकर्षित अस म्हणु शकु अस मुखपृष्ठ खुपच सुंदर आकर्षक रंगीबेरंगी रंगाची उधळण 

मृखपृष्ठ बघीतल्या बरोबर गजराचा सुगंध मनात भरावा असा सुंदर मांडणी

एकुण३६ ललित लेख संग्रह यात आहेत

संवेदनशिल मनातील तरल भावभावनांचा संयमित भावतरंग म्हणजे  हा ललित लेख संग्रह

ललित लेखनाची व्याप्ती फार मोठी आहे त्यामुळे मनात गुंजन करणारे भुरळ पाडणारे शब्द भाषा सौंदर्याने अतिशय चपखल शब्दाची मांडणी म्हणजे ललित लेखन ललित लेखन हे लालित्य पूर्ण भाषीक शैली त असणे गरजेच 

ललित हे मनात असणार्या आंतरीक भावनाची अभिव्यक्ती

वेगवेगळ्या भावनांचा भावतरंग सौंदर्याचा अविष्कार म्हणजे " गजरा " ललित संग्रह

विविध अंगानी ललित उमलत जात हळव्या मनातील भावनेचा सुगंध सतत दरवळत ठेवायच कौशल्य म्हणजे ललित असत गजरा वाचत असताना एक गोष्ट लक्षात आली कि आपण आपले भावविश्व विसरून जा तों आणि समरस होतो ललित मधील भावनाशी त्यातील अंतरंग उकलताना जणु काही आपण वेगळ्याच भावविश्वात संचार करायला लागतो आणि त्यातच विहार करायला लागतो 

मला " गजरा " आवडायचे प्रमुख कारण म्हणजे यात स्त्री सुलभ भावनेच्या विविध अंगानी विचार करून तो अतिशय मार्मिक पणे : हळुवार पणे फुलविला गेला आहे शब्दाची पखरण अतिशय संयमित आणि चपखल पणे केलेली आहे..

ललित बंधात लेखिकेने खुप काही सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे यात आलेल्या " काव्यपंक्ती मनाला भाऊन जातात 

यात काहि विषय चिंतनशिल प्रमाणे मांडलेले आहेत 

तितक्याच मिश्किलपणे दुसरा विषय मांडताना दिसतात 

मिश्किल शैलीतील ललित वाचताना वाचक सुद्धा हासतो हासताना नेमकि पुल च्या साहित्य वाचताना ची आठवण जागी करून जातात एवढ मात्र निश्चित 

संवेदनशिल मनान लिहीलेल साहित्य मनाला किती भावत आणि वाचताना वाचक किती एकरूप हो तो एवढ मात्र खर 

जनजीवनाशी परिचित निगडीत विषयाचे उत्तमरित्या अभ्यासुन अतिशय बारकावे लक्षात घेऊन सुक्ष्म निरिक्षण करून सौंदर्यपूर्ण बाजु मांडु न  वाचकाला एकात्मक राहण्यास भाग पाडणार ललित लेखनाचे खास वैशिष्ट्य आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही असे मला मनापासून वाटते

कोणतेही ललित काढून तरल भावभावनांचा मनमुराद आनंद वाचकाला निश्चित मिळतो 

विविध अंगानी ललित असे फुलत जात फुलताना हळव्या मनातील भावनेचा सुगध सतत दरवळताना चा अनुभव वाचकाला होतो 

विविध भावनांच्या सुमना ची गुंफण असलेला " गजरा " याच मुळे मनाला भावतो 

मनावर मोरपिसारा फिरवण्याच काम " गजरा " करतो त्यामुळे तो अधिक वाचनिय आणि मनाचा ठाव घेणारा मनात रुंजण घालणारा झाला आहे त्यामुळे " गजरा " अतिशय भावला आहे एवढ मात्र निश्चित

 

        श्रीकांत धारकर

         बुलडाणा

      ९०११०२३१९८ 

-

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू