पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मैत्री

"कसा आहेस रे माझ्या बुढ्या बाबा? बरा आहेस ना? चार पाच दिवसांत ऑनलाईन दिसला नाहीस." अप्पांचे whatsapp किणकिणले.

"अरे बुढा होगा तू. बरा तर आहेच आता अजून चांगला होईन मी. बोल"

खरंतर अप्पा तेव्हा उदास होते. सध्या घरातच बसावे लागत असल्याने त्यांचे गुडघेही दुखत होते. खूप चिडचिड होत होती. पण जीवलग मित्राशी गप्पा झाल्या आणि अप्पांचा मूड ताळ्यावर आला.

हा शिऱ्या माझी दुखरी नस बरोब्बर ओळखतो. शाळेत असतांना ह्याला पेलवत नाही म्हणून जरा दप्तर काय उचलले ह्याने तर आयुष्यभर माझे इमोशनल बॅगेज सांभाळले. दोस्त असावा तर असा. सतत साथ निभावणारा. सच्चामुच्चा.  

मित्राशी मारलेल्या गप्पा आप्पांसाठी औषधाचे काम करुन गेल्या. 


 

 


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू