पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गोष्ट एका अब्दुलभाईची..

सूर्य जसा जसा वर यायचा..तशी जिंतूर नाक्यावरची गर्दी वाढू लागायची. शहराच्या    बाहेर रस्त्याच्या कडेला झाडं लावतात तशी,शहरात रस्त्याच्या कडेला दुकानं थाटतात. रस्त्याचं आणि दुकानाचं मग होतं एक नातं-दुकानं तरी कसली? साचे साधे फळाचे गाडीवाले. ..फेरीवाले...वेगवेगळ्या दिवसात वेगवेगळे व्यवसाय करणारे...ही सारी मंडळी गर्दी करायची जिंतूर नाक्यावर परभणी शहरातील हा जिंतूर नाका म्हणजे अतिशय वर्दळ असणारे ठिकाण . रिक्षावाले तिथेच थांबायचे ...अखंड प्रवाहासारखी वाहनं सतत चालू रहायची ..जवळच शाळा व कॉलेज असल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी व शिक्षक या रस्त्यावर दिसायचे.....सायकल तर स्पर्धा लावल्यासारख्या रस्त्यावरून पळत रहायच्या.याच रस्त्यावर कडेला एक छोटंस सायकल दुरुस्तीचं दुकान होतं...दुकान कसलं...रस्त्यावर एक लाकडी पेटी ठेवलेली असायची.त्यातच काही दुरुस्तीची हत्यारं,जुनी रिंग,काडया,मोडकं-तोडकं सामान ठेवलेलं असायचं.दुकानाच्या मालकाकडे पाहिलं की कुणाला सुध्दा पटेल की,कुठलाही व्यवसाय करायला विशिष्ट वयाची गरज लागत नाही..हो अगदी अब्दुल नावाचा जेमतेम 9 ते 10 वर्षाचा मुलगा पटापट पाने घेऊन सायकल खोलून मोकळी करायचा....लगेच बरोबर दुरुस्त करून बसवायचा...पंक्चर जोडायचा...वेगवेगळे सुटे भाग वेगवेगळया पध्दतीनं काढून दाखवायचा.त्यानं काही भाग काढले की त्याची नावं सांगायचा.एक्सल,आऊट चक्का वगैरे वगैरे..तेव्हाच काही शब्द माझ्या कानावर प्रथम गेलेले.आजही चांगले स्मरणात आहेत.नेहमी आठवत ही राहतात....केवळ त्या अब्दुल मुळेच ..

तेव्हा मी डी.एड.ला परभणीला शिकायला होतो.त्यामुळे त्याच नाक्यावर तासनतास फिरायचो...आमच्या सर्व मित्रमंडळीला या अब्दुलभाईचं फार कौतुक वाटायचं ... गोष्ट ही तशीच होती हा मुलगा दिसायला जरी लहान असला तरी अत्यंत चपळ आणि चुणचुनित होता. सायकल दुरूस्तीला नेली तेंव्हा मित्रानं विचारलं पैसे कित्ते देणे के तेव्हा तो म्हणाला द्यो ना भई क्या देणे का है सो. आज ही मला त्याच्या मोठेपणाचं कौतुक वाटतं.त्याच्या कपडयावरून किंवा राहणीमानावरून त्याला खरंच पैशाची गरज वाटत नव्हती असे म्हणावे तरी कसे? अगदी कुठलंही बाहेरचं जग न पाहता लहान वयातच धंदा करायला आलेला ...

प्रथम या अब्दुलची भेट झाली.काही दिवसातच आमच्या सर्व मित्राबरोबर त्याची दोस्ती जमली..कधी किरायाची सायकल लागली तर आम्हाला ओळख द्यायचा. कधी कोणाची सायकल दुरुस्त करून द्यायचा.कॉलेज सुटल्यावर किंवा आगोदर आम्ही त्याच्या दुकानावर हमखास 10-15 मिनिटे उभे राहून पहायचो...त्याच्याशी गप्पा मारायचो.आणखी एक नवलाची गोष्ट म्हणजे त्याने एक जुन्या सुटटया भागापासून छोटी सायकल तयार केली होती.या सायकलवर टांग टाकून जणू स्वतःच्या मोटरसायकलवर बसल्याच्या थाटात इकडे तिकडे तो फिरायचा.तेव्हा त्याच्या चेह-यावरचे भाव अगदी काही तरी जिंकल्यासारखे असायचे ....मुदददाम आम्हाला चक्कर मारून बघा म्हणायचा या सायकलवर आणि आम्ही चक्कर तर मारायचो पण कधी काम पडले तर मागून घेऊन त्याची सायकल न्यायचो तेव्हा त्याच्या दातृत्वाची खरी प्रचिती यायची.आज अनेक माणसे मी पाहिली अनेक गोष्टी ते दान करतात.अनेकांना ते मदत करतात.परंतु या छोटया अब्दुलभाईने केलेली छोटी मदत किंवा दातृत्व मनाचा मोठेपणा याची सर कशालाच येणार नाही.असे वाटते...अतिशय लहान वयात तो एवढा आनंदी कसा काय राहतो याचं नवलच करावं लागेल.

सगळया गोष्टी कशा काय जमतात .?याचं नेहमी कौतुक वाटायचं ...पुन्हा आपण एवढं शिक्षण घेऊन आपल्याला त्या 9 -10 वर्षाच्या निरक्षर मुलापासूना काही गोष्टी शिकून घ्याव्या लागतात.ह्याबद्दलही कसंतरी वाटायचं.नेहमीच आश्चर्य वाटायचं....त्याच्या वडीलाची आमची कधी भेट झाली नाही ...कधी तो लहान वय आहे म्हणून कामात अडला असे ही आढळले नाही..रोज सकाळी नित्यनेमानं नाक्यावर हसतमुख भेटायचा ...आम्ही विचारायचो क्या चल रहा है अब्दुलभाई ?तो काम करत करत म्हणयचा बस दुवा है आपकी खरं तर आम्हाला त्याच्या वागण्या बोलण्यावरून खूप काही शिकण्यासारखं होतं वास्तविक आम्ही डी.एड. चे विद्यार्थी म्हणजे त्याच्या मानाने शिक्षक होतो. परंतु त्याने शिकविलेले काही पाठ.खरोखरंच कुठल्याच शाळेत शिकायला मिळणारे नव्हते. परंतु जीवनाच्या शाळेत मात्र ते फार उपयोगी होते. जणू तो स्वानुभवातून आम्हाला पाठ  घेऊन दाखवत होता असेच वाटते ...नंतर पुन्हा कधी तो भेटला नाही.न जाणे तो कुठे असेल? काहीच कल्पना नाही ....परंतु नेहमी तो जीवनाच्या अतिशय कठीण प्रसंगी आठवत राहतो....धीर देत राहतो आमचा त्याचा काय संबध ! ना तो शिकायला. आमच्या बरोबर ना तो वयाने आमच्याबरोबरचा.तरी देखील कितीतरी प्रभाव टाकून गेला .तो छोटासा अब्दुलभाई.

संतोष सेलूकर ,परभणी

7709515110

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू