पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ती रात्र..... वादळीरात्र!

#लघुकथा

 

#ती_रात्र ......  वादळी रात्र!!

 

(टिप : कथा काल्पनिक आहे. उल्लेख केलेल्या घटना पात्र याचा वास्तवाशी काही संबंध नाही. )

 

पाली हिल्सची सेवन क्लाऊडस् बंगलोज् सोसायटी..... त्यात राहणारे बडे बडे बिजनेसमन पोलिटिशन एक से एक नामी हस्ती. आज अरबी समुद्र खवळला होता आणि दुसरीकडे अख्खा भारत लॉकडाऊन झाला होता म्हणून सगळे आपापल्या घरात अडकले होते. बाहेर पडणारा मुसळधार पाऊस थांबायच नाव घेत नव्हता. आणखी एक दिवस असाच पावसाचा जोर राहिल अशा बातम्या पसरत होत्या. त्यातलाच एक चतुर्वेदी हाऊस हा बंगला. बाहेर गुलमोहराच्या झाडावरच पाणी पाहात एक तिशीतली तरूणी एका खोलीत पुस्तक नीट लावत फोनवर बोलत होती. 

 

"हॅलो.. मा! हा मी ठीक आहे!"

तू ठीक आहेस ना 

हो मा!  मा मी जेवले. 

तुम्ही पोहचलात ना गोव्याला नीट

 

पलीकडून काळजीच्या सुरात.

हो ग! बरं.... पावसाने जोर पकडला असेल ना मुंबईत!! आता रस्ते पण ब्लॉक होतील!  तू सामान आणून ठेवलस ना!! फार बाहेर जाऊ नकोस आणि तुझी अौषधं.......

 

"हो मा!!  चार दिवसापूर्वीच तुम्ही किराणा भरला होता. आणि माझी अौषध मी अॅपवरून मागवेन ग!! किती काळजी करशील..... "

 

"अस कस तू एकटी राहतेस तिथे!! काळजी वाटते ग रेवा तुझी. तुझी ती मैत्रिण शमिता! ती पण नाही आणि आता लॉकडाऊन सुरू होईल. त्यात ते कसल निसर्ग वादळ येणार आहे म्हणे!! त्यामुळे आणखी भीती! शमिता असती तर काही काळजी नव्हती गं. आणि तू फोन पण........ 

 

रेवाची आई तिकडून बोलत होती. पण ही कंटाळली होती आईच्या सततच्या सुचनांमुळे मधेच आईला अडवत 

 

"हो गं मी फोन करेनच!!  बर माझा पास्ता येईल आता. ठेवते फोन! बाय बाय !! लव्ह यु मां!"

अस म्हणत रेवा फ्रेश व्हायला गेली. 

 

******** 

 

मुंबईला पाली हिलस् येथे नवीन बंगल्यात ती सहा महिन्यांपूर्वीच शिफ्ट झाली होती. व्यवसायाने आर्किटेक्ट असणारी रेवा चतुर्वेदी. गोव्यात बालपण आणि वकिली फॅमिली बॅकग्राउंड असणारी रेवा एखाद्या मॉडेलपेक्षा कमी नव्हती. ५'७" हाइट हिरवट करडे डोळे लांब केस शिवाय ती हुशार होती. ब्युटी विथ ब्रेन अस डेडली कॉम्बिनेशन!! बट स्टिल सिंगल!!  तिच करिअर तिच्या अचिव्हमेंटस् लव लाईफ सगळ काही सेट होत. पण त्या घटनेमुळे सगळ चेंज झाल. ती एकटी पडली होती. 

 

रेवाने आतापर्यंत बड्या बड्या हस्तींचे फार्म हाऊसेस् अॉफिसेस् बंगलोज् डेकोर केले होते. त्यात डॉ. गानू एक नामवंत सायकिलॉजिस्ट ते राजकीय वर्तुळात सक्रीय असणारे सागर कांबळे नागपाल मुर्ती फिल्म डिरेक्टर बिपिन रॉय असे सगळेच टॉप लेवल असणारे अासामी होते. आणि आता सोनिगरा ज्वेलर्सचे अोनर रमणिक सोनिगरा यांच्या माटुंग्यातल्या बंगलोसाठी डिजाईनस् तयार करत होती. 

 

 

******** 

 

 

थोड्याच वेळात पुन्हा पाऊस सुरू झाला. एक माणूस तिचा पास्ता घेऊन आला. नुकतीच फ्रेश होऊन आलेली रेवा अजून तिच्या बाथरोबमधे होती. तिला अस पाहून थोडा गडबडलाच आणि निघून गेला. डिनर टेबल वर बसून ती चिकन पास्ता विथ रशिअन सॅलड आणि मधेच वाईन असा अस्वाद घेत होती.  पानात घेतलेला पास्ता संपतो तोवरच तिच्या फोनची रिंग वाजली. 

 

"हॅलो हा निक कसा आहेस आणि"

यावर निक

"ते नंतर आधी तू न्युज लाव तो आमदार माळींचा खून झालाय त्यांचा मुलगा खून करून बेपत्ता झालाय ते घरच सीसीटिव्ही फुटेज दाखवत आहेत बघ."

 

"अरे पण त्याच काय!! पोलिस आहेत ना "

 

"अग तेच तर माझा एक मित्र आहे पोलिसात! तो सांगत होता की तो आपल्या पाली हिलस् एरिआतच फिरतोय. "

 

"अो एम जी!!!"

 

"यु शुड बी अलर्ट!!! आणि काही लागल तर फोन कर."

 

"अोके थँक्स निक !!!"

 

रेवा घाबरली होती बर्‍यापैकी.

'बापरे म्हणजे तो हलकट '

 

थाड थाड थाड ऊं ऊं ऊंहम्

 

रेवा निकला काही बोलली नाही. घरात येणारे विचित्र आवाज आई बाबा गोव्याला निघाले तेव्हापासून हे आवाज येत होते. आधीपण यायचे!! पण फक्त तिलाच!! निकला मागे सांगितल . त्याने वेड्यात काढल. वरवर ती अोके दाखवत होती. पण ती जाम घाबरली होती.

 

'काय करू मी!! हा आवाज मलाच येतोय का!! पण आत्ता दुसर कुणीच नाही. कुणाला सांगू!! कुणी तरी आहे इथे!! जस्ट डायवर्ट युअर माइंड रेवा. हा मी.... मी कामाला बसते. '

 

असा मनातल्या मनात विचार करत राहिलेला पास्ता आणि सॅलड तिने फ्रीजमधे ठेवले. आणि खोलीत गेली. लॅपटॉपवर कॅड अोपन करून मि. सोनगिरांच्या प्रोजेक्टवर काम करत बसली. 

 

**********

 

वादळी पावसामुळे सगळे रस्ते तुंबले होते. एवढ्यात लाईटस् गेले. ती दचकलीच. आणि इतकावेळ शांत असणारी रेवा पुन्हा पॅनिक झाली. आजूबाजूला दाट झाडी, लाईटस् गेलेले आणि ही तिच्या घरात एकटी. तिला बाहेर काही तरी हालचाल जाणवली.

 

एका हातात रॉड घेत मोबाईल टॉर्च घेऊन ती खोलीतून बाहेर अाली. जिना उतरून ती खाली आली. आणि तिथेच इन्व्हरटरच बटण अॉन केल. हॉलमधे एकच दिवा अॉन झाला. रात्रीच्या त्या भयाण पावसात फक्त घड्याळाची टिक ऐकू येत होती. वीज कडाडली की तिच्या चेहर्‍यावरची भीती दिसत होती. दारावर टकटक झाली. जरा जरा वेळाने ती होतच होता.  कपाळावरचा घाम पुसत ती पुढे सरकली. तिने पीप होल मधून पाहिल. 

 

एक पावसात भिजलेला इसम हातात सामान धरून उभा होता. तिलाच हाका मारत होता. हा कोण कुठला आमदाराचा खुनी आमदाराचा मुलगा असावा की चोर मनात प्रश्नच प्रश्न होते. स्वत:ला सावरत तिने दार उघडल. 

 

रेवा!!! र रेवा!!! अोपन द डोअर!! 

 

रेवा - क् कोण आहे

 

तो माणूस - रेवा अग मी!! प्लीज अोपन द डोअर!!

 

रेवाने भीत भीतच दार उघडलं. 

 

रेवा - कोण (वीज लकलकली) अनि!! अनिकेत तू!! 

 

अनि - येस ! थँक गॉड तू अोळखलस!!

 

रेवा - तू...... तू इथे कसा!! आणि मी का अोळखणार नाही!!

 

अनि - अग!! बाहेर पाऊस पडतोय! गारठलोय! आपण आत बोलूया 

 

रेवा - अोह!! आय अॅम सो सॉरी!! प्लिज ये ना आत  

 

अनि - नीड टू चेंज पुरता गारठलोय. तू कॉफी बनवशील. 

 

येस अस म्हणत तिने त्याला खोली दाखवली. टॉवेल दिला आणि कॉफी बनवायला आत गेली. 

 

कॉफी घेऊन ती आत गेली. दाराबाहेरच ती उभी होती. तो अजून चेंज करत होता. त्याच घट्ट पिळदार शरिर!!  चार वर्ष झाली ब्रेकअपला ! पण अजूनही तसाच दिसतो तसाच फॉर्मल वागतो. असे अनेक विचार येत होते. पण तो माझा नाही. असा विचार येताच ती भानावर आली. आणि दाराबाहेरूनच त्याला हाक मारली. 

 

इतक्यात लाईट आली. कॉफी पिताना दोघाच्या गप्पा सुरू होत्या. दोघेही किस्से आठवत भूतकाळात रमले होते. 

 

अनिकेत कटारिया! तिच्यासारखाच आर्किटेक्ट होता. आणि पक्का बिजनेस मॅन!! त्याबाबतीत तसा श्रुड होता.   दोघांच एकच कॉलेज नंतर एकाच ठिकाणी जॉब त्यानंतर पार्टनरशिप. या प्रवासात ते खूप क्लोज आले होते. यु नो दे वेअर मूव्हड् टुगेदर!! नंतर पार्टनरशिप आणि लव्हशिप दोन्हींच ब्रेकअप करून तो चेन्नईला गेला. तिथूच कधी हैद्राबाद, दिल्ली,  युके,  युएसए,  मालदिवज् अशा ट्रिपस् होत होत्या. 

 

साउथचे स्टार धनुष, रविकांत बाबू , गणेश दुगुबुत्ती अशा मोठ्या लोकांची घरं डिझाईन केल्यानंतर अनिकेतची तिथे डिमांड वाढत होती. एकाकडे काम अावडल्यानंतर माऊथ पब्लिसिटीमुळे त्याचा बिझनेस वाढला होता. काही दिवस ब्रेक घेऊन तो अलास्काला गेला होता. तिथून निघाला आणि ढगाळ हवेमुळे मुंबई आणि नंतर लॉकडाऊनमुळे तो तिथेच अडकला होता. हे सगळ ऐकताना मधेच तिला ते आवाज पुन्हा येऊ लागले. 

 

*********

 

तिची वाट न पाहता त्याने किचनचा ताबा घेतला आणि दोघांसाठी स्टफ पास्ता बनवला. कॅन्डल लाईटमधे दोघे भरपेट जेवले. बर्‍याच महिन्यांनी ती त्याच्या हातच जेवत होती.

 

किचन आवरताना ती त्याच्या शेजारच्या निकचे किस्सेही सांगत होती. ते ऐकताना मधेच तो बाहेर निकच्या बंगल्याकडे पाहात होता. तोही त्याचे बिझनेस टूरचे किस्से सांगत होता. नंतर मधेच कॉलेजचे किस्से सुरू झाले.त्यात रागिणीच नाव निघाल्यावर इतका वेळ हसणारी ती एकदम गंभीर झाली. 

 

रेवा - ती !!! ती....  आई बाबांबरोबर गेली गोव्याला परत. 

 

हे उत्तर ऐकून तो चपापला. "ही खोट का बोलतेय. कारण रागिणी तर!!" 

 

********

 

रागिणी तिची मोठी बहिण होती. रेवापेक्षा ती सुंदर होती. लग्नाच्या आधी अशाच एका रात्री ती आमदार माळींच्या घरी त्याच्या घराचे डिझाईनस् घेऊन गेली होती. वादळी पाऊस होता त्या रात्री! नंतर परत आली ती जखमी आणि विमनस्क अवस्थेत. तिच्यावर माळींच्या मुलाने हात टाकला होता. तिला कशाचीच शुध्द नव्हती. आमदाराने त्याच्या पावरचा वापर करून केस दाबून टाकली. या सगळ्याचा परिणाम तिच्या मनावर झाला होता. आणि बहिणीच्या अवस्थेला रेवा स्वत:ला दोषी मानत होती.  याच दरम्यान तिच अनिकेतशी ब्रेकअप झाल. होतं. आणि तिच्या मनातून या घटना जातच नव्हत्या. त्यासाठी तिच्यावर डॉ. गानूंची ट्रिटमेंट सुरू होती.

 

**********

 

फार न बोलता रेवा झोपायला गेली. आणि तोपण शेजारच्या खोलीत झोपायला गेला. बराच वेळ त्याला झोप नव्हती. भूतकाळातल्या गोष्टी त्याला सतत डाचत होत्या.  म्हणून तो आयपॅडवर गाणी ऐकत काम करत होता.

 

आ sssss 

 

रेवा किंचाळत उठली. आवाज ऐकून अनिकेत रेवाच्या खोलीत गेला. त्याला पाहून ती त्याच्या मिठीत शिरली. त्याला सोडायलाच तयार नव्हती. सारख " तू मला सोडून जाऊ नको" असच बडबडत होती. तो तिला शांत करत म्हणाला

 

अनि - हो रेवा!! मी आहे अाधी शांत हो मी..... मी आहे इथे. 

काय झाल सांगशील का!!! 

 

रेवा - ते वरच्या खोलीत!! 

 (पुन्हा लाईट गेले. पाच मिनिट ती असंबध्ध बोलत होती. आणि तो तिला शांत करत होता पण मधेच त्याला दूर ढकलत.) 

तू पुन्हा जाशील मला सोडून.... नको तू... जा!  मी करेन मॅनेज तू जा! आपल बाळही गेल आता तू का आलास जा परत जा. हा!!  हा भास आहे मला माहिती आहे तू नाहीच अालेला इथे इट जस्ट माय इमॅजिनेशन. 

 

त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तिला त्याने शांत केल. तिची खात्री पटवून दिली की तो खरच!!! तो खरच तिच्यासोबत आहे! आणि तिच्याकडे परत आलाय!!  

 

अनि - रेवा भानावर ये!

 

पुन्हा तिला विचित्र आवाज येऊ लागले. ती अोरडली. आणि रडायला लागली. आणि तिची अौषध घेतली. ती अजूनही त्याला सांगत होती. की घरात त्या दोघां व्यतिरिक्त कुणीतरी आहे. आता तो खरच वैतागला. घरात लाईट असूनही ती लाईट गेलेत असं म्हणत होती. 

 

अनि - हे बघ रेवा शांत हो. मगाशी सगळेच लाईट गेले होते. आता लाईट आहेत. बघ जरा. घरात कुठेही अंधार नाही. भानावर ये. 

 

तिने बघितल तर बाहेर खरच लाईट होते. पुन्हा घराच्या वरच्या दिशेने पाहू लागली. 

 

अनि - आता काय?? ये! वर पण जाऊ..... ये. काय आहे ते पाहूच या. 

 

रेवा नको म्हणत असूनसुध्दा हाताला धरून तो तिला वरच्या खोलीत घेऊन गेला. तिथला मेन स्विच पण दाखवला 

 

अनि - हा बघ मेन स्विच मगाशी ट्रिप झाला होता. एक फेज गेली होती. हा घे आता तर आले ना लाईट आणि ही खोली या खोलीतही कुणीच नाही. 

 

रेवा स्वत:शीच बडबडत होती मधेच अनिला काहीतरी सांगत होती - 

अस कस होईल मी त्या आमदार माळींच्या मुलाला बांधून ठेवल होत. स्वत:च्या वडिलांना मारून तो इथे आला होता मला मारायला. त्यानी तस कबूल पण केलय. कसा तरी बचाव करून मी त्याला इथे बांधला. आणि ती न्युज!! मला निकने सांगितली.

 

अनि - अग विहान माळी दुबईत आहे. हे बघ गुगलवर तो सहा महिन्यांपासून तिकडे आहे. आणि वर्ष झाल आमदार माळींना मरून ते हार्टअटॅकने मेले. त्यानंतर इथल सगळ गुंडाळून तो मुलगा विहान सहा महिन्यापूर्वीच तिकडे सेटल झाला. आणि तू म्हणतेस तो तुझा शेजारी निक तोही दोन वर्षांपूर्वीच घर विकून केरळला सेटल झालाय. त्याच्याशी बोललो मी. 

 

रेवा - म्हणजे आता रागिणीला न्याय मिळणार नाही. 

 

अनि - काय संबंध तिचा !! तिने सुसाईड केले ना..... तुझ्याच समोर!! आफ्टर बिकमिंग रेप व्हिक्टिम!!! 

 

रेवा - हो आणि तो रेप त्या माळींच्या मुलाने! विहानने केला होता.

 

अनि - कस शक्य आहे. तुझी बहिण रागिणी आमदारांच्या घरी गेली. सगळे प्लानस् दाखवायला. वाटेत गाडी खराब झाली म्हणून थांबली. तिची विसरलेली फाईल तो विहान द्यायला आला ड्रायवरसोबत !!! वाटेत तुझ्या बहिणीची गाडी दिसली पण ती नाही दिसली. आवाजाच्या दिशेने गेला तर तिच्यावर रेप झालेला होता. ट्रक ड्रायवर आणि त्याच्या मित्राला यानेच बदडला दोघांना!! आणि ड्रायव्हरच्या मदतीने पोलिसात दिला. रेपमुळे तिला जबरदस्त धक्का बसला होता. ती काहीच सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. तुमची कुणाची बदनामी होऊ नये म्हणून तुझ्या बाबांची अवस्था बघून विहाननेच केस दाबली. रागिणीला कशाचीच शुद्ध नव्हती !!  तूच तिची काळजी घेत होतीस. तुला माहिती आहे ना! आणि त्याच अवस्थेत तिने महिन्या भरात सुसाईड केले.  आणि हे तू जेव्हा स्वत:च्या डोळ्याने पाहिलस तेव्हा तू स्वत:ला दोषी मानत होतीस त्याच दरम्यान वी लॉस्ट बिग प्रोजेक्ट अँड अवर बेबी टू. आणि मी तू बोलत नाहीस त्याबद्दल राग मनात ठेवून निघून गेलो होतो. त्यावेळी मला माहिती पण नव्हत तुझ्या प्रेग्नंसीबद्दल!! 

 

रेवा - हां !!! नाही अनि!! नाही माझा तुझ्यावर विश्वास नाही. हे शक्य नाही. आणि तू तर इथे नाहीसच हा हा माझा भास आहे!! 

 

अनि - रेवा फोर गॉड सेक!! माझ्यावर नाही पण गुगल?? अग गुगल अोपन कर विहान माळीबद्दल तरी!!  

 

तिने लगेच  विहान माळीबद्दल गूगल सर्च केल. तर अनिकेत सांगत असलेलं सगळ खर असल्याच तिला जाणवल. 

 

रेवा - पण हे सगळ तुला कस माहिती तू आत्ता अालास काही वेळापूर्वी. 

 

अनि - हो तू झोपल्यावर तुझ्या डॉ. गानूंचा कॉल होता. मी त्यांना या सगळ्याबद्दल विचारल कारण ही इज व्हेरी गुड सायकोलॉजिस्ट. आपण त्यांच्या बांद्रा इस्टला असणार्‍या घराच प्रोजेक्ट केल होत. मी त्यांच्याशी बोललो शिवाय तुझ्या घरी गोव्याला फोन लावला. तेव्हा हे सगळ मला कळलं. हे घे तूच बोल डॉ. गानूशी. 

 

त्यांच्याशी ती व्हिडिअो कॉलवर बोलत होती. मधे मधे ती प्रश्न विचारत होती. डॉक्टरही शांतपणे तिला उत्तरं देत होते. तिला आठवण करून देत होते. आणि गोळ्याही त्यांचा इफेक्ट दाखवत होत्या. तिला आठवत होत. 

 

अनि - आता तुझी खात्री पटली.

 

डॉ. गानू : अाणि हा खरच अनिकेत आहे तुझा भास नव्हे!!

 

रेवा - येस डॉक्टर 

 

डॉ. गानू : तू गेला आठवडा दीड आठवडा गोळ्याच घेतल्या नाहीस. अस कस चालेल. आणि मी गोळ्याही बदलून दिल्या होत्या.

 

अनि - म्हणजे डॉक्टर ??

 

डॉ. गा. - हो मलाच इथे टेन्शन आल होत. ही आज कळवणार होती बदलून दिलेल्या गोळ्याबद्दल. 

 

अनि - पण कसल्या गोळ्या???

 

डॉ. गा. - हे जे एका मागून एक तिला धक्के बसले रागिणीचा रेप तिची आत्महत्त्या तुमच ब्रेकअप तिच मिसकॅरेज या सगळ्यामुळे ती खचली होती. त्यामुळे तिच मन तिच्याशी भास आभास या प्रकारचा खेळ खेळत होत. इटस् केस अॉफ डिप्रेशन!! या सगळ्यात तिच्या जवऴच्या माणसापैकी रागिणी मेली आणि तू निघून गेलास. तिचा फोकस ढासळत होता.

                या सगळ्या धक्क्यांमुळे केमिकल इंबॅलेन्स झाला. आणि वर्तमान भूतकाळ भविष्यकाळ या सगळ्याची गल्लत होऊ लागली. इतकच नव्हे तर तिने स्वत:भोवती इमॅजनरी जग तयार केल. ज्यात ती स्वत:ला सेफ प्रेडिक्ट करत होती आणि वास्तवाची जाण झाली की ती पुन्हा स्वत:ला एकट फील करायची. म्हणजेच इमॅजिनेशन आणि वास्तव यात फरक ती विसरू लागली. परिणाम तिच डिप्रेशन वाढू लागलं. 

           इतकेदिवस तिचे आई बाबा होते. जस जमेल तस ते तिला कंट्रोल करत होते. सो शी वॉज बिकमिंग नॉर्मल पण आता या लॉकडाऊनमुळे ते गोव्यात अडकले आणि आठ दिवसापासून तिची मोलकरीण हिराबा पण नाही. ती येत होती तेव्हा ती हिला अौषधं वेळेवर देत होती. शिवाय तिच्या तब्बेतीबाबत मला वेळेवर रिपोर्टिंग होत. 

 

अनि - यु डोन्ट वरी डॉक्टर मी आहे आता हिच्याजवळ मी अपडेटस् देत जाईन. 

 

डॉ. गानू - या शुअर अँड यु कॅन कॉल मी एनी टाईम

 

त्या रात्री दोघ बराच वेळ अगदी पहाटे चार पर्यंत गप्पा मारत होते. इतके वर्ष मनावर साचलेले मळभ आज उगवत्या सुर्यासोबत नाहीस झाल होत. आज खर्‍या अर्थानी दोघे पुन्हा एकत्र आले पुन्हा वेगळे न होण्यासाठी!! ते वेगळे झाले त्याला जशी ती एक रात्र जबाबदार होती. तशीच त्यांना एकत्र आणणारीही ती एक रात्र होती. अशीच वादळी रात्र!!! 

 

समाप्त

©®अादिशा

(ईशिता फडणीस)

 

तळटिप : या अॅपवर पहिल्यांदाच कथा पोस्ट करतेय. काही इतर ऍपवर कथा पोस्ट केल्या आहेत. आता या ऍपद्वारे नव्याने आणि मोठ्या गॅपनंतर पिन्हा लिखाण सुरू करते. काय मग कशी वाटली ही कथा!! कळवा हं नक्की!! मी वाट पाहते!! लवकरच भेटू पुढच्या दीर्घ कथेत!!! त्याचा उद्या ट्रेलर टाकेनच!!! तोपर्यंत सायोनारा!!!

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू