पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सोप्पं नसतं बाई होणं

सोप्पं नसतं बाई होणं
लेखिका - जयश्री बिरादार.
लेखनप्रकार - अलक


ती काळा कोट घालून केस लढण्यासाठी कोर्टासमोर हजर होती. न्यायधिश सोडून इतर सर्व वकील सहकारी तिच्याकडे आश्यर्याने पाहत होती.
न्यायधीश साहेबांनी विचारले,

 'ॲडव्होकेट भट्ट, आर यू शअर टू प्रोसीड?'

ॲडव्होकेट भट्ट म्हणाल्या, 

'येस मिलॉर्ड विद युअर परमिशन वी कॅन प्रोसीड.'

आणि दररोज प्रमाणे कोर्टाच्या ही सुनावणी ला सुरवात झाली. कोर्टाचे दिवसभराचे कामकाज संपवून सर्वजण कुजबुजत बाहेर पडत होती, तिला स्पष्ट कानावर पडेल इतपत मोठ्याने बोलत होते, 

'काय तर बाईला हौस आहे, नवरा मरून दोन दिवस पण झाले नाही लगेच आज कोर्टात यायची काय गरज आहे'

मधेच दुसरा कोणी तरी बोलत होता, 

'अहो ती बाई डीव्होर्सी आहे तिला नवरा मेल्याचे काय दुःख असणार!'

ही सर्व कुजबुज कानावर पडत असताना सुध्दा ती तेथून घरी निघून गेली. कारण ती कोणाला आणि किती समजावणार की सोप्पं नसतं बाबांनो बाई होणं..

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू