पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

राघव.

*राघव.*

********

          बहिणीच्या घरी पहाटे चार वाजता उतरलो तिच्या अंगणामध्ये एक पेरूचे झाड बर्‍यापैकी वाढलं होतं. त्या झाडाला खूप पेरू लागायचे त्या झाडा पासूनच गच्चीवर जायला रस्ता होता, अंगण छोटासाच असल्यामुळे गच्चीवर जाण्याच्या पायऱ्या गच्चीवर चौकटचा भाग येथून पेरू तोडता यायची. पेरू पिकल्या नंतर अतिशय गोड व चविष्ट असल्याने लहान मुलांसह मोठ्या माणसाना ही पेरू खाण्याचा मोह आवरायचा नाही. माणसा बरोबरच पक्षी ही या पेरूचा आनंद घ्यायचे. विशेष करून पोपटांचे थवेच्या थवे येऊन झाडावर बसायचे. पेरूचा आस्वाद मनसोक्त घ्यायचे. 

                मी दुसऱ्यांदा जेव्हा बहिणीच्या घरी आलो तेव्हा त्यांच्या घरात एक लहानसा पोपट पिंजऱ्यामध्ये असलेला मला दिसून आला. पोपट का आणला अशी चौकशी केली असता आपल्या घरात भरपूर पेरू आहेत आणि बारामाही पेरू लागतात म्हणून पोपट पाळला असल्याचे मला सांगण्यात आले. म्हणजेच नाल सापडली म्हणून घोडा विकत घेण्या सारखा प्रकार आहे असे मला वाटून गेले. मी लहान भाच्यांना पोपटा विषयी विचारले तेव्हा ते म्हणाले मामा या पोपटाला आपल्या घरातली एवढी सवय झाली आहे की सकाळी त्याला पिंजऱ्यातून काढून थोडा वेळ मोकळे सोडण्यात येते परंतु तो उडून जात नाही. उलट थोडसं फिरल्यानंतर तो आपोआप पिंजऱ्या मध्ये येऊन बसतो. अर्थात मला ह्या बोलण्याचा फरक पडत नव्हता, त्यांनी प्रात्यक्षिक दाखवण्या साठी माझ्या समक्ष त्या पोपटाला मोकळे सोडले आणि त्याच्या समोर पिकलेला पेरू तोडून ठेवला. खरोखरच पोपटाने तो पेरू मनसोक्त खाल्ल्या नंतर तो आपल्या पिंजऱ्यात जाऊन बसला. अर्थात सर्वजण सवयीचे गुलाम असतात, त्यात तो पोपट ही त्याला अपवाद कसा असणार. त्या नंतरचा दुसरा भाग म्हणजे वाड्यातल्या वर्दळी पेक्षा आपला लहानसा पिंजरा बरा सुरक्षित, म्हणून ही कदाचित तो पिंजऱ्यात जाऊन बसत असेल. 

            भाची आणि बहिणीशी यथावकाश बोलणे झाल्या नंतर त्या पोपटाला पिंजऱ्यात डांबून ठेवणे माझ्या नैतिकतेला पटत नाही असे सांगितल्या नंतर सगळेच म्हणाले, आम्ही त्याला सोडायचा खूप प्रयत्न केला परंतु तो जात नाही, तुम्हाला सोडायचा असेल तर उद्या सोडून पहा. खातरजमा केल्यानंतर मी पोपटाला मुक्त करण्याचा विचार करून दुसऱ्या दिवशी झोपेतून उठलो, उठल्या नंतर सकाळी सात साडेसात वाजता मी त्या पोपटाला पेरू तोडून नाही दिला, तर त्याला मी झाडाच्या फांदीवर बसले परंतु त्याला झाडाच्या फांदीवर बसायला स्वतःच्या शरीराचे बॅलन्स करता येत नव्हते. थोड्याशा प्रयत्ना नंतर पंखांची फडफड आणि शेपटीचा योग्य उपयोग करून तो फांदीवर बसून राहिला परंतु फांदीवर हाल चाल करण्यास तो अडखळत होता. मी त्याला तसेच उपाशी ठेवले परंतु त्याला पेरू तोडून दिला नाही. दोन-तीन तासाच्या स्थितप्रज्ञते नंतर तो हाल चाल करायला लागला. शेजारच्या फांदी वरील पानातील एक कच्चा पेरू तो खायला लागला. आत्मविश्वास हरवल्या नंतर परिस्थिती  माणसालाच नाही तर पक्षाला ही गुलाम बनवते हे या पोटावरून, त्याच्या वर्तनावरून सिद्ध झालं. त्याच्याच स्वातंत्र्या साठी त्याला मदत करायची नाही, हा निश्चय मी मनात केला होता. कच्चाच का होईना पोटभर पेरू खाल्या नंतर तो तेथेच बसून राहिला. हळुवार पणे चोंचित फांदी धरून पायाने हलचाल करून, प्रसंगी पंखांचा उपयोग करून तो फांदीवर चालायला लागला. हा त्याचा कार्यक्रम दहा ते बारा पर्यंत चालू होता. त्यानंतर मात्र तो एका पिकलेला पेरू पर्यंत पोहोचला. तिथे त्याने पिकलेल्या पेरूचा आस्वाद घेतला, या वेळेस आकाशातून उडत जाणाऱ्या पोपटांच्या थव्यांच्या सादेला तो प्रतिसाद देत होता. त्यांच्या आवाजात आवाज मिसळून ओरडत होता. असे करत करत त्यांनी दोन-तीन वेळेस आकाशातून जाणाऱ्या पोपटांच्या थव्यांना त्याने प्रतिसाद दिला...... आणि शेवटी तो पेरूच्या झाडाच्या शेंड्यावर पोहोचला. तिथे झुकलेल्या सर्वोच्च फांदीवर तो पायात फांदी धरून बसून राहिला. आकाशातून जाणाऱ्या पोपटांच्या थव्यांचे ओरडणे ऐकून तो तसेच ओरडून त्यांना प्रतिसाद देत होता... आणि काही वेळा आकाशात आणि काही वेळा खाली आमच्याकडे पाहत होता. हा प्रकार तीन-चार वेळेस झाल्या नंतर त्याने फांदीवर बसल्या बसल्या आपले दोन्ही पंख उघडून त्या पंखांची फडफड जाग्यावरच करून पाहिली. त्या नंतर मात्र आकाशातून जाणाऱ्या पोपटाच्या थव्यांना प्रतिसाद देत आपले दोन्ही पंख फडफडले. पायांनी फांदीवर जोर देऊन आकाशात जी भरारी घेतली, ती  त्याची गरुड झेप ठरली. त्याने बंदिस्त असलेला पिंजरा व त्याला जीव लावणाऱ्या माझ्या बहिणीच्या कुटुंबाला शेवटचा रामराम ठोकून आकाशात उड्डाण केले. तो आकाशात परांगदा झाला. आपल्या साथीदारा सारखाच आवाज त्याने काढला. त्याचे उड्डाणे यशस्वी झाल्या नंतर सर्वात जास्त आनंद मला झाला. अर्थात माझ्या बहिणीच्या लहान मुलांना आनंद झाला किंवा दुःख हे निश्चित भावना मला कळू शकले नाही परंतु मामा तुमच्या मुळे पोपठ मुक्त झाला ही प्रतिक्रिया त्यांनी मात्र मला बोलून दाखवली. यशस्वी उड्डाण राघवाचं आकाशात झालं होतं. तेव्हा त्याला थव्यात स्थान मिळाले असेल काय, हा प्रश्न माझ्या मनात अनुत्तरित होता.


शिवाजी घोरपडे.®©

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू