पाहुले चालती पंढरीची वाट
माझी ही कथा आहे भक्तआणि भगवंत यांच्या अपार प्रेमाची..
मी अगदीच १८वर्षा ची असताना आमच्या समोरच एक आजोबा राहायचे.... त्यांचं वय खूपच झालं होतं... वयाच्या मानाने त्यांना आता दिसायला कमी झालं होतं... थोडासा हळूहळू चालत येऊन ते आपल्या बागेत बाहेर बसायचे... आणि मलाही ते आजोबा खूप आवडायचे म्हणून मी त्यांच्याजवळ जाऊन गप्पा मारत बसायचे... रोज थोडं का असेना त्यांच्याशी बोलल्याशिवाय माझा वेळ जायचा नाही...
आजही मी त्यांना भेटायला गेले तर आज ते खूपच उदास होते... मी विचारलं "आजोबा काय झालं," तर ते म्हणले काही नाही,
मी म्हणालो,"आजोबा खोटं नका बोलू मला माहिती आहे तुम्ही आज नाराज आहात". तुम्ही रोज माझ्याशी किती गप्पा मारता आज खूपच गप्प बसला आहात, सांगा बघू पटकन काय झाल आहे, त्या वरती ते आजोबा म्हणाले,
"काय सांगू बाळा तुला.. तुला माहिती आहे मी अगदी लहान असल्यापासून वारीला जात आहे... आज पर्यंत असे एकदाही झालं नाही की मी पंढरपूरची वारी चुकवली आहे..
जेव्हा मी ५वर्षाचा होतो होतो तेव्हा मी माझ्या बाबांच्या सोबत गेलो होतो, तेव्हा मी त्या विठ्ठलाला प्रॉमिस केलं होतं की मी जोपर्यंत माझे श्वास चालू आहे तोपर्यंत मी तुझी प्रत्येक वारी करेन...
अन तुला माहितीये आज पर्यंत हे प्रॉमिस मी कधीच मोडलं नाही... आणि आता ही माझी खूप इच्छा आहे तिकडे जायची..
पण माझ्या मुलांना मला सक्त मनाई केली आहे... आता मी उद्या वरती गेलो तर त्या भगवंताला कसं तोंड दाखवू तू सांग..
आजोबा तुमच्या मुलांनी जे केले ते बरोबरच केल आहे ना,,, तुमचा आता वय झाला आहे तुम्हाला दिसत नाही तुम्ही चालत जाऊ शकत नाही... खूप गर्दी असते त्यामुळे तुम्हाला ते कसे जाऊ देतील...
त्यावर आजोबा म्हणतात,"मला माहिती आहे माझ्या काळजीसाठी ते सगळं नको म्हणत आहेत पण माझ्या मनाच काय करू, माझं प्रॉमिस मोडेल ज्या भगवंताला मी केल आहे त्याचं काय करू... मी म्हणले,"आजोबा तुम्ही इथूनच पाया पडा, विठू माऊली तुम्हाला इथूनच दर्शन देतील"एवढं बोलून मी तिथून निघून आले.
त्यानंतर एक-दोन दिवस झाले आजोबा बाहेर आलेच नाहीत... मला काही केला रहावे नाच..
मी त्यांचा दरवाजा वाजवला तर त्यांच्या मुलांनी दरवाजा उघडला,"मी त्यांना विचारलं आजोबा कुठे आहेत मला दिसली नाहीत... ते वारीला गेलेत का,
त्यांचा मुलगा मला हात करून आतल्या बेडरूम मध्ये जायला सांगतात,
तर मी आत मध्ये गेलो तर आजोबा बेडवर पडून असतात, मला समजतं की त्यांनी आता खाणं-पिने पूर्ण बंद केल आहे,
मी आजोबांच्या जवळ गेले आणि त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं,"आजोबा काय झालं तुम्हाला, तुम्हाला वारीला जायचं होतं इतकं मनावर घेतला की तुम्ही अंथरूण धरला,
तुम्ही नका काळजी करू तुम्हाला जायचं आहे ना मी तुमच्या मुलाशी बोलते ते तुम्हाला नक्की लावून देतील,, तुम्ही उठा पाहू पटकन लवकर जाऊ आपण,
त्यावर आजोबांचा मुलगाही पुढे येतो आणि म्हणतो,"बाबा तुम्हाला खरंच जर पंढरपूरच्या वारीला जायचं असेल तर चला मग मी घेऊन जातो तुमच्यासोबत मी येतो, मला माफ करा आजोबा मला माहित नव्हतं तुमची भक्ती एवढी मोठी आहे,, वारी चुकल्यामुळे तुमची ही अवस्था होईल मला माहिती नव्हतं,
त्यावर आजोबा हळू आवाजात म्हणतात,"नाही बाळा मला आता कुठे जायचं नाही,
"आणि तुम्हाला कोणी सांगितलं माझी वारी चुकली आहे म्हणून,
मलाही तसंच वाटलं होतं की यावर्षी माझी वारी चुकली, पण तसं काही झालं नाही, माझ्या विठू न मला कधीच दर्शन दिले आहे,
त्यावर मी म्हणलं आजोबा असं कसं म्हणता तुम्ही, त्यावर आजोबा म्हणाले, काल रात्रीच मला माझा विठू येऊन भेटून गेला... तो मला म्हणाला, "मग काय झालं तू यावर्षी मला नाही भेटायला आलास तर, मी आलो तुझ्याकडे, जशी तुला माझी ओढ असते तशी मलाही तुझी ओढ असतेस की, दरवर्षी वारीला तू येतोस न चुकता, तसं मी न चुकता दरवर्षी वारीत तुझी वाट पाहत उभा असतो ना... आता यावर्षी तुझी तब्येत खराब आहे तू येऊ शकत नाहीस म्हणून काय झालं मी आलो तुला भेटायला... जसं तू ना मला प्रॉमिस केला होतास की मी दर वारीला मी येईल म्हणून तसं मी एक प्रॉमिस आहे प्रत्येक भक्ताला भेटायच ... तो बोलला मला,"मी येतून च त्याच्या पाया पडलो तरी माझा नमस्कार कायम त्याच्यापर्यंत पोहोचणार" कारण तो इथे आहे आजूबाजूला सगळीकडेच आहे... तो माझ्या इथे आहे हृदयात आहे...
आजोबा मला म्हणतात बाळा तू म्हणाली होतीस ते खरंच बरोबर होतं, मी आता इथूनच त्याला नमस्कार करतो, माझे खरंच इतकी वर्ष चुकलं, मला वाटायचं त्या पंढरपुरातच माऊली आहेत, पण मी खरंच चुकीचा होतो बघ, ते तर माझ्या इथ हृदयात आहेत बघ, एवढेच म्हणतात त्यासमोरला विठ्ठलाच्या मूर्ती कडे एकटक लावून बघतात..
मी आजोबांना म्हणतो आजोबा बोला ना काय झालं... पण आजोबांनी ते डोळे मिटले होते ते कायमचेच...
जाताना आजोबा मला एकच सांगून गेले,"की विठू माऊली फक्त पंढरपुरात नाही आहे... ते सगळी कडे आहेत... कधी तुम्हाला कामातून तब्येत बिघडली तर किंवा खूप काही अडचणी असतात... त्यामुळे तुम्ही वारी करूच शकत नाही चुकते... त्यामुळे दुखी नका हो ऊ.... कारण तो भगवंत तुमच्या हृदयात आहे... तुम्ही गेला नाही तर तो नाराज नाही होणार... तो तुमच्या जवळ आहे तुमचा मनात, तुमच्या डोळ्यात, तुमच्या मुखात....फक्त शोधा नकीच सापडेल...
ज्याला भक्त आणि भक्ती या दोन्हीचा फरक समजतो त्याला खरा भगवंत समजतो.
राम कृष्ण हरी,
