डोळ्यातील पाणी
कांचन मोरे या एका कोल्हापूर जिल्ह्यातील छोट्याशा गावात मुख्याध्यापिका होत्या. त्यांच छोटास कुटुंब होत. एक मुलगा एक मुलगी आणि नवरा.. सासू-सासरे तर त्यांच्या लग्नाच्या आधीच वारले होते... छोटासा परिवार होता पण त्या खूप समाधानी आणि आनंदी राहायच्या... पण म्हणतात ना देवाला जास्त आनंदी लोक नाही आवडत... आणि एके दिवशी असाच झाल, त्यांची मुले जमतेम पहिली दुसरीलाच असतील तोपर्यंत त्यांच्या नवऱ्याच निधन होते.. एवढा मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला होता. मुले अजून खूपच लहान होती तोपर्यंतच नवऱ्याची साथ सुटते ..याच्या इतकं मोठं दुःख एका बायकोला काय असू शकत नाही का... पणती तिच्या मुलांच्यासाठी उठून उभी राहते... एवढा मोठा दुःखाचा डोंगर मागे टाकते आणि मुलांचया साठी ती स्वतःला सावरते, कारण एक बायको काहीच करू शकत नाही मात्र एक आई ठरवलं तर खूप काही करू शकते.
खूप कष्ट करते दिवसाची रात्र करते.. आणि आपल्या दोन लहान मुलांच शिक्षण पूर्ण करते.. स्वतःची हाऊस मौज मागे सारते आणि ती आपल्या मुलगीला ग्रॅज्युएशन पर्यंत शिकवते तर मुलग्या ला इंजिनियर बनवते... आपल्या मुलगी च लग्न मोठ्या थाटामाटात करून देते... मुलगाही आता इंजिनिअर झाला होता आणि तो पुण्याला जॉब साठी निघून जातो... तसं तर आता तिला काहीच टेन्शन नव्हतं... आता जरा आनंदी राहू लागली होती ती... रिटायर झाली होती आणि सगळी जबाबदारी मात्र तिच्या मुलाने घेतली होती... लहानपणापासून आईचे दुःखत पाहणार हा मुलगा ही आता आईला जास्त काम लावून देत नव्हता. आपल्या आईन आता आनंदी राहाव असेच त्याला वाटायचं...
आणि एक दिवशी असच कांचन मॅडम यांना त्यांच्या मुलाचा फोन आला... आणि तो म्हणत होता की त्याला जरा छातीत दुखत आहे म्हणून आज तो कामावर गेला नाही... त्या नी काळजीने म्हणतात गोळ्या खा आणि आज आराम कर जाऊ नको... दिवसभर मात्र कांचन यांना इकडे काळजी लागून राहिली होती.. दिवसभर झोपू दे म्हणून त्या कॉल करत नाहीत आणि संध्याकाळी जेव्हा त्या कॉल करतात तेव्हा तो उचलत नाही... त्यांना वाटतं की कुठेतरी ठेवून बाहेर गेला असेल... आणखी थोड्या वेळाने करतात तर पुन्हा ही फोन उचलत नाही.. तसं तर त्यांना एवढं माहिती होतं की त्यांचा मुलगा कितीही वेळ झाला किंवा ती लेट झाला तर त्याचा फोन कायम उचलायचा.. आता मात्र त्यांना खूपच टेन्शन येऊ लागलं... एकदा सोडून दहा वेळा त्यांनी फोन लावला पण उचलला जात नव्हता... आता मात्र त्या घाबरतात,, हृदय त्यांच धडधड करू लागले..
खूप वेळा ट्राय करूनही त्यांन फोन उचलला नाही रात्रीचे सकाळ होत गेली... त्या माऊलीने काय फोन करन बंद केले नाही... काय माऊलीच्या डोळ्यात झोपही नाही आली... मुलग्याची काळजी मनाला सतत वाटत होती... सकाळी मात्र तिला राहवले नाही... पटकन आपल्या मुलगीला फोन करून बोलून घेते आणि तिला घेऊन पुण्याला जायला लागते.... रात्रीचा एक एक क्षण तिला कसा घालवला आहे तिच तिला समजत नव्हतं... पण तो घालवताना तिला काहीच वाटले नाही पण बस मधले एक क्षण मात्र तिचा जीव घेत होतं... म्हणतात ना मुलाच्या हृदयातल्या सगळ्या भावना आईला समजतात असंच काहीसं झालं होतं... मनामध्ये खूप सारे विचार येत होते त्याला काहीतरी झालं नसेल असं सारखं मनाला वाटत होतं मनाला समजावत होती ती... देवाकडे प्रार्थना करत होती की तो असू दे सुखरुप म्हणून...
आणि 24 तासाच्या काळजीने एकदा का ती पुण्यात येते आणि ज्या ठिकाणी तिचा मुलगा राहत होता त्या रूम जवळ येऊन बाहेर उभी राहते... गेट पासून आज जाताना पाय उचलत नव्हता... पण कसंतरी धावत धावत ती जाते दरवाज्यापाशी आणि दरवाजा बाहेरून जोर जोरात वाजवते पण आतून काहीच आवाज येत नाही... आता मात्र तिचा हृदय खूपच घाबरत... डोळ्यातलं पाणी कशी तरी आवडत होती... कधीपासून हुंदका आवरून घेतला होता तिने..
आजूबाजूची लोक गोळा होता तिथे आणि दरवाजा हातून उघडत नाही म्हणून दरवाजा तोडला जातो. ... आणि जेव्हा ती आत मध्ये येते आपल्या मुलगा तिला निपचिप बेडवर पडलेला दिसतो... फोनला हात पोहोचलाच नाही फोन वाजत होता उचलण्यासाठी ,,, आणि फोन उचलायच्या आधीच त्याचे प्राण गेले होते... कारण काल रात्रीच त्याला हार्ट अटॅक घेऊन गेला होता...
ते सगळं समोरच दृश्य पाहून मात्र त्याची आई डोळ्यातलं पाणी तशीच घेऊन एकटक त्याच्याकडे पाहत असते कारण समोर तीस वर्षाचा तिचा मुलगा या जगातून गेला होता.... हृदय जोर जोरात रडत होतं तोंडातून उच्चार फुटत नव्हते डोळ्यावर अंधारी आल्यासारखं होतं आणि तिथेच निपचूप खाली पडते...
ज्याच्यासाठी आज वर ती जगत होती त्याच्याकडे बघून आजपर्यंत ति श्वास घेत होती... ज्याच्यात तिचा जीव अडकला होता... देवानं आजही तो तिच्याकडून हिरावून घेतला होता.... आता ह्याच्यापेक्षा मोठं दुःख तिच्यासाठी काय असू शकतं.... आणि इतकं ही वाईट कुणाच्या आयुष्यात घडू नये इतकं वाईट तिच्या आयुष्यात घडलं होतं. आणि आता सगळं संपलं होतं सगळं संपलं होतं.
.
