पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

नकळत

   राहुल आणि विनया यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम असतं.१० वर्षांचं त्यांचं प्रेम.एकमेकांवर पूर्ण विश्वास.आता त्यांच्या लग्नाची बोलणी चालू असतात.त्यांच्या घरच्यांनी ६ वर्षांनी राहुल आणि विनया च प्रेम मान्य केलं.
    पण, म्हणतात ना कोणत्याही नात्याला कधीही दृष्ट लागू शकते.चक्क तसच झाल! विनया एका मुलांसोबत बोलत होती.त्या मुलाच नाव होतं चेतन.१ वर्षभरापूर्वीच त्यांची आॅफिस मध्ये ओळख होते.ती त्याच्याबरोबर भावाच्या नात्याने बोलत असते.पण,तो वेगळ्या इराद्याने विनया शी बोलत असतो.मग काही दिवसांनी विनया आपला नंबर चेतन ला देतेदोघ फोन वर पण बोलू लागतात.तेव्हा चेतन आपलं तुझ्र प्रेम आहे असं विनया ला सांगतो.पण,विनया त्याला सांगते माझा boyfriend आहे.आपण friends म्हणून बोलू.चेतन ok म्हणतो.तिला सर्व विचारून घेतो.राहुलचा स्वभाव कसा आहे.तो कसा वागतो.वैगरे
.    सगळ नीट चालू असतं आणि अचानक विनयाचा आॅफिस मध्ये एक अफवा उठते की,चेतन आणि विनया यांचं प्रेमप्रकरण सुरू आहे.जेव्हा विनयाला हे कळत तेव्हा ती राहुलला फोन करते.झालेला प्रकार सांगते.राहुलला तिने आधी कल्पना दिलेली असते.कि मी चेतन शी बोलते तो मला भावासारखा आहे.म्हणून राहुल ला आवडत नसताना पण तो तिला काही बोलत नाही.थोडस चुकतच राहुलचं.सगळी बातमी राहुलला समजते.तो म्हणतो,मी येऊ का आॅफिस मध्ये? विनया नको म्हणते.राहुल म्हणतो, विनया हे जर घरी समजलं तर मग काय करायचं? झालं तसंच राहुलच्या घरी हे समजत.खूप भांडण होतात.लग्न मोडण्यापर्यंत जात.तेव्हा राहुल विनयाला फोन करून सगळं विचारून घेतो की ओळख कशी झाली.नंबर कसा मिळाला.तेव्हा सगळं ऐकून राहुल दु:खी होतो.मला न विचारता विनया ने अनोळखी मुलाला नंबर कसा दिला? यावरून तो विनया ला खूप ओरडतो.चेतन ला मारण्याचं पण म्हणतो.पण पुढचा विचार करून विनया त्याला थांबविते.पण बाहेरून राहुल चेतन ची बातमी काढतो तर तो बाईल वेडा माणूस असतो.राहुल विनयाला जबरदस्तीने चेतन चा नंबर ब्लाॅक करायला लावतो.आणि राहुल चेतन ला जाऊन भेटतो,राहुल चेतन ला काय भानगड आहे ते विचारतो.तेव्हा चेतन म्हणतो अरे कोणी काय केल? काय माहित? लोक काही पण करतात.पण मल माहिती आहे हे कोणी केलंय. राहुल म्हणतो,मग तू मला त्या माणसांची नावं सांग.तर चेतन नाव सांगायला काही केल्या तयार होईना.तेव्हा राहुल चेतनला खूप मारतो.तेव्हा जे सत्य समोर येत.ते ऐकून राहुल आणि चिडतो.कारण,चेतन च ही अफवा उठवतो.कारण,त्याला राहूल आणि विनयाच relationship मोडायच असतं.राहुल चेतनला विनया समोर नेतो आणि खरं सांगायला लावतो.विनयाला आपली चूक कळते.की,मी याला आधीच लांब ठेवला असता तर या चेतन ने एवढं केलच नसतं.मीच त्याला hopes दिले.राहुल म्हणाला विनया मी तुला याच्याशी बोलताना अडवायला हवं होतं.विनया आणि राहुल ने एकमेकांना मिठी मारली आणि लवकरच त्यांच लग्न झालं.
         मित्रांनो,third person always destroyed every happy relationship.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू