Back to Book Details Report Reviews

अंधारात भेटलेली कविता

साहेब ऑफीस मध्ये येताच खुर्चीवर बसले आणि फाईल टेबलावर टाकत म्हणाले 

जरा माझ्या साठी भाड्याने घर शोधशील का?

मी हलकासा "हो" म्हणालो मागे वळून निघणार इतक्यात ते पुन्हा म्हणाले थांब. मी पण येतो 

आम्ही दोघे शहरभर फिरू लागलो 

रस्तात भेटेल त्याला विचारू लागलो 

संध्याकाळ आता अंधारात विरघळत होती दिव्याच्या पिवळसर उजेडात शहर थकल्या सारखं दिसत होत.

अचानक साहेब म्हणाले जरा त्या बाई जवळ गाडी थांबव.

 रस्त्याच्या कडेला एक स्त्री शांत उभी होती. 

चेहऱ्यावर थकवा होता पण विचित्र स्थिरता होती.

मी गाडी थांबवून विचारले

 मॅडम येथे कुठे भाड्याने घर मिळेल काय?

पोलिसांची गाडी पाहून ती घाबरली पण 

क्षणात स्वतःला सावरत म्हणाली 

"हो"मिळेल ना पण आता उशीर झाला आहे उद्या या

मी... मदत करते"

क्षणभर शांतता पसरली

संपर्कासाठी 

तिचा नंबर घ्यावा की माझा नंबर द्यावा काही सुचत नव्हते 

तीच हलकस हसत म्हणाली.

सर.. तुमचा नंबर द्या मी फोन करते.

मी नंबर दिला 

गाडी पुढे निघाली पण... मन कुठेतरी मागेच थांबलं होतं 

दुसऱ्या दिवशी साहेब सुट्टी वर गेले होते. दुपारी फोन वाजला 

सर... मी कविता बोलते

तिच्या आवाजात एक वेगळीच ओढ होती 

तुम्हाला घर पाहिजे ना?मग या माझ्या घरा शेजारी एक घर भाड्याने देणे आहे.

मी गेलो

घर छोट होत. साहेबाना ते पसंत पडल नसत.

हे लगेच लक्षात आलं. पण त्या घरापेक्षा तिथे राहणारी"कविता "मनाला जास्त भावली.

हळूहळू बोलणं वाढत गेलं 

फोनची सवय लागली.

दिवस संपण्याआधी तिचा आवाज ऐकला नाही 

तर काही तरी अपूर्ण राहल्या सारखं वाटू लागलं.

"कविता"हसायची पण तीच हसू पूर्ण नव्हतं 

तिच्या डोळ्यात कायम कुठेतरी वेदना दडल्या असायच्या.

एक दिवस तिच्या घरी जाणे झाले.ती घरी एकटीच होती घरात शांतता होती. आणि त्या शांततेत अनेक न बोललेले शब्द.

मी तिच्या कडे पाहत म्हणालो "कविता" तू मला आवडतेस.

ती काही बोलली नाही.

फक्त खाली मान घालून उभी राहिली.

मी हलकेच तिचा हात हातात घेतला.

तिचं अंग थरथरत होतं.

त्या स्पर्शात वासना नव्हती. होता फक्त आधार.

दोन एकाकी मनाचा निशब्द संवाद.

ती माझ्या मिठीत आली आणि कित्येक वर्षाचं दुःख डोळ्यातून वाहू लागलं.

नवरा असून ही मी कायम एकटी राहिले.

ती रडतं म्हणाली 

"कधी प्रेमाने जवळ घेतलं नाही कुणी"

त्या रात्री आम्ही खूप बोललो.

जखमा सांगितल्या 

एकमेकात विसावलो.

त्या नंतर अनेक भेटी झाल्या.

अनेक संध्याकाळी.. अनेक रात्री.

जिथे शब्द कमी आणि भावना जास्त होत्या.

पण नियतीला बहुतेक तीच सुख मान्य नव्हतं.

एक दिवस अचानक माझी बदली झाली.

कायमची.

शेवटच्या भेटीत कविता काही बोलली नाही.

फक्त माझ्या मिठीत स्वतःला सामाहून घेतं राहली.

तिचे अश्रु माझ्या खांद्यावर पडतं होते.

आणि माझं मन आतून तुटतं होतं.

मी निघालो 

गावं मागे पडल 

रस्ते बदलले 

माणसे बदलली 

पण अजूनही..

कधी रात्री उशीरा शांतता पसरते,

तेव्हा त्या अंधारात उभ्या असलेल्या स्त्रीची 

आठवण पुन्हा जागी होते.

आणि मन हळूच कुजबुजते.

"कविता... तु अजूनही माझ्यात कुठेतरी जिवंत आहेस"


Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu