पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

काय बदलाल. का बदलाल. कसे बदलाल.

*निबंध*

 

काय बदलाल. का बदलाल. कसे बदलाल.

 

      आपल्या देशात मला जर काही बदलता आले. तर मी सर्वप्रथम देशातील जाती व्यवस्था बदलीन.

 

       *बदलण्याचे कारण-जात ही देशाला लागलेली एक कीड म्हणजे जात . जातीच्या नावावर कित्येक मोठमोठाली दंगे झाली खून झाले रक्ताचे पूर वाहिले. कधी जातीच्या नावावर दंगे तर कधी धर्माच्या नावावर.

          या जातीने देशाचे फार वाटोळे केले आहे. आपण पेपरला टीव्हीला बातमी पाहतो तरुण मुला मुलींचे एकमेकावर खूप प्रेम असते. परंतु त्यांच्या प्रेमाच्या आडवी हीच जातं येते त्यांची जीवनज्योत संपवण्यात सुद्धा हीच जातं कारणीभूत असते या पृथ्वी तलावार फक्त दोनच जाती आहे त्या म्हणजे( १)  स्त्री  (२) पुरुष आपल्या देशामध्ये आपला स्वार्थ साधण्यासाठी काही लोक ह्याच जाती-धर्माच्या नावावर लोकांना भडकवतात त्यांच्यामध्ये फुटा पाडतात.

            जी लोकांच्या मनातून जात नाही तिचं नाव जातं आहे अशा या जातीला आळा घातला पाहिजे. सर्व माणसांच रक्त सारखाचं आहे मग हा माणूस वेगळ्या जातीचा तो वेगळ्या जातीचा असे का ? या जातीला माणसाच्या डोक्यातून बाहेर काढायचे आहे

      *कसे बदलायचे-

 सर्वप्रथम आपल्या घरातील लहान मुलांच्या मनावर जातीचा प्रभाव पडू द्यायचं नाही.

देशातील मुला मुलीला त्यांच्या मनासारखा साथी निवडण्याचा अधिकार मिळायला पाहिजे. जातीपातीला कोठे थारा दिला नाही पाहिजे .

बऱ्याच समाजामध्ये मुलींची संख्या कमी असल्यामुळे मुलांचे वय चाळीस पन्नास झाले तरी त्यांना मुली मिळत नाही जर जात आडवी नसती आली तर या मुलांचे लग्न वेळेच्या आत झाले असते बऱ्याच मुलाचे लग्न होत नसल्या मुळे त्यांच्या डोक्यात असुरी विचार येतात आणि वाईट मार्गाने चालू लागतात.

           मला जर काही बदलता आले तर मी जातीलाचं बदलीन माणसं तर काळाने परिस्थितीने बदलतं असतात.

 

जातीपातीला नको आता थांरा

माझा देश एक आहे एकच राहीनं सारा..

 

 

कवी- भारत लक्ष्मण झिने.मु.पो. डोणगाव.ता.जि. जालना.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू