???????? नियती ????????
प्रतिलिपी,तील बंधू आणि भगिनी ,मुला मुलींनो मी ही जी कथा लिहीत आहे ही एक सत्य कथा आहे मन सुन्न करणारी,मी ती शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे.काही चुका होतील तर प्लिज सांभाळून घ्या,माझ्या निदर्शनास आणा--
१०-०८-१९८८ रोजी आम्हाला अंगणवाडी सेविकेच्या प्रशिक्षणासाठी, मांजरीफॉर्म पुणे येथे पाठवण्यात आले .आम्ही 4जणी कल्याण तर36जणी भिवंडी तालुक्यातील आशा मिळून 40 जणी होतो.तेथील नियम खूपच कडक होते,पण एकूण वातावरण मस्त होते.
सर्व काही व्यवस्थित,मजेत चाललं होतं.आणि एक दिवस अचानक (दुभाण की भादाण गावाच नाव मी कन्फ्युज आहे.) भिवंडी ता.तील शारदा नावाच्या मुलीच्या नावे तार आली.तेथील नियम असा होता की,आमच्या साठी आलेले टपाल प्रथम हेड मॅडम च्या टेबलावर जात असे.ते वाचून जर आक्षेपार्ह नसेल तर आम्हाला मिळत असे.आणि आक्षेपार्ह असलं की मग जिला पत्र आलं असेल तिची तासडपट्टी होत असे म्हणून तारही मॅडम जवळच गेली.
देशपांडे मॅडमनी वाचल्या नंतर ,शिपाई आमच्या वर्गात आला आणि आणि मॅडम नि भिवंडीच्या दोघी जणींना बोलावलंय म्हणाला.पोस्टमनला आम्ही पाहिलं होतं त्यामुळे आमच्यात कुजबुज सुरू होती,की नक्कीच काहीतरी गोची
आहे.कोणाचं तरी पत्र आक्षेपार्ह असावे.आणि ते भिवंडीतीलच
असेल..वगैरे...
थोड्याच वेळात मॅडम त्या दोघीं सह वर्गात आल्या
,
आणि शारदा कडे पहात बोलल्या,"शारदा तयारी कर तुला घरी जावे लागेल.पोहचेपर्यंत रात्र होईल म्हणून कोणीतरी दोघींना बरोबर ने.काय झालं मॅडम ?शारदा नि घाबरून विचारलं.
काही लिहिलं नाही फक्त तुला बोलावलंय घरून अस म्हणून
मॅडम नि कोण जात आहेत बरोबर ते ठरवलं.
शारदा बरोबर ,दुसरीही शारदा आणि रोहिणी गेल्या.
आम्ही सगळ्याच बुचकळ्यात पडलो की झालं काय? पण
मॅडम समोर बोलायची कुणाचीच हिम्मत नव्हती.वर्ग सुटल्या नंतर तर्क वितर्कांच पेवंच फुटलं होत,गंभीर वातावरणात कसे तरी वेळ काढत होतो.दुसऱ्या दिवशी ही तोच विषय,त्या तिघी परत येतील तेव्हाच के ते कळेल ,कारण आता सारखे मोबाईल ही नव्हते आणि गावात लँडलाईन ही नव्हता.गप्प बसल्या शिवाय पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशीही कोणीच आल्या नाही
अखेर तिसऱ्या दिवशी दुपारी 12 च्या सुमारास त्या
दोघी( शारदा सोडून) आल्या .आल्या त्या थेट मॅडम च्या केबिन मध्ये जाऊन ,दहा मिनिटांनी कपडे बदलून वर्गात आल्या.सर्वांच्याच प्रश्नार्थक नजरा त्यांच्याकडे वळलेल्या पण
दुपारच्या सुट्टी शिवाय पर्याय नव्हता.दुपारची सुट्टी झाल्यावर मात्र सर्वांनी त्यांना घेरले.काय झालं होतं..ते सर्वांनाच ऐकायचं
होतं. आणि मग जे त्यांनी सांगितलं ते या प्रमाणे----------
"शारदा च घर मोठं पण कौलारू,घरात सासूबाई,नवरा शरद आणि दोन मुलं.मुलगा साडेतीन वर्षांचा मुलगी
दीड वर्षाची. ट्रेनिंगला येताना मुलं सासूबाईंकडे ठेऊनआलेली
आजी प्रेमाने नातवंडांचं संगोपन करत होती .रात्री मुलगा बाबांजवळ पलंगावर तर ,मुलगी ला घेऊन त्याच रूममध्ये आजीबाई जमिनीवर अंथरुण घालून झोपत असत.आणि त्या
दिवशी रात्री पावणेबारा च्या सुमारास मूलगा जोरजोराने किंचाळत रडू लागला,"बाबा मला साप चावला,......हे एकच वाक्य तो पुन्हा पुन्हा बोलत होता.शरद खडबडून उठला,पटकन लाईट लावून बाळाला उचललं ,घाबरून पूर्ण अंग तपासलं,काहीही झालं नव्हतं.आजी पण उठल्या दोघांनी
पूर्ण घर तपासलं,कुठेही काही नव्हतं...पण...बाळ मात्र रडतच
होता.त्याला उचलून घेऊन खूप समजावलं की ते स्वप्न होत .
शेवटी रडत रडत चार वाजेच्या सुमारास तो झोपला.
सकाळी कामावर जाताना शरदनी पाहिलं बाळा शांत झोपलेलाच होता. दिवसभर ही रोज प्रमाणे च खेळत होता.रात्रीच काहीच त्याला आठवत नव्हतं.त्या दिवशीही रोज
प्रमाणे ते सर्व झोपले. ....आणि आदल्या दिवस प्रमाणेच बारा
वाजताच्या सुमारास बाळा पुन्हा किंचाळत उठला... तो तेच
ओरडत होता...बाबा..,मला साप.. चावला.. पण कालच्या अनुभवामुळे ,शरद आणि आजी घाबरले नाहीत.पुन्हा आईला
झोपायला सांगून शरद त्याला खांद्यावर थोपटत येरझाऱ्या मारून बाळाला गप्प करून झोपवण्याचा प्रयत्न करत होता. पण बाळा मात्र बरोबर आदल्या दिवसा प्रमाणेच चारच्या वेळेला झोपला.
तिसऱ्या दिवशी मात्र कामावर जायच्या वेळीच शरद आईला म्हणाला,"आई,आज बाबा त्याला रात्री अंगारा लाव आणि तुझ्याच जवळ घे झोपायला,छोटीला मी घेईन. अग
दोन दिवस जागरण झालंय कामावर पण झोप येत होती.आई
हो म्हणाली.बाळा शांत झोपलेला होता.त्याच्याकडे लक्ष द्यायला सांगून शरद कामावर गेला.बाळा उठल्यावर आजींनी
त्याची दृष्ट काढली.त्याच्यावरून अंड ओवाळून फेकलं.तो मात्र
नार्मल होता.
रात्री ,बोलल्या प्रमाणे मुलांची अदली बदली केली
बाळाला आजीने तर छोटीला शरदनी झोपायला घेतली.दोन्ही
मुलं मस्त झोपली होती.आणि तो क्षण आला...रात्री बाराच्या
सुमारास बाळा परत किंचाळ्या मारू लागला.पण आजी आणि शरदला आता सवय झाली होती.अग आई तू अंगारा लावला होतास का त्याला ?शरद नि विचारलं !हो रे बाबा कशी
विसरेन?त्याला उद्या नेऊया कुठे तरी. तू झोप मी गप्प करते आई म्हणाली,तसा शरदनी डोळे मिटले.आणि आजींनी बाळाला अधिकच जवळ छातीशी लावून थोपटू लागली.पण तो जर जोराने ओरडतच होता. आजी त्याच्या अंगावर हात फिरवत होती.आणि अचानक आजी ओरडली...श..र....sss..द
तो जागाच होता चटकन उठून,काय झालं ग..त्यानी विचारलं.बाळाच्या अंगावर हात फिरवताना त्याच्या
पायावर काही तरी गरम गरम ओल तिच्या हाताला लागलं होतं
लाईट लाव लवकर..ती ओरडली.तस शरदनी ही घाबरून लाईट ऑन केली.बघतो तर काय..?बाळा चा पाय रक्ताने माखलेला...पायाला कुत्र्याने चावा घेतला प्रमाणे जखम झालेली...दोघा माय लेकांच्या अंगाचा थरकाप झाला.आजू बाजूला ...पाहिलं तर भलामोठा नाग फणा काढून बसला होता.त्यांचा आरडा ओरडा ऐकून शेजारी ही आले......
क्षणाचाही विलंब नलावता शरद बाळाला घेऊन धावत सुटला,त्याच्या मागे दोघेजण शेजारी पण गेले.त्यांचं गाव रोड टच नव्हतं 15-20 मिनिटे चालल्यावर हायवे लागत असे.रोडवर जाताच ,एक ट्रक ला हात केला,तो थांबलाही त्यात बसून ते निघाले...पण इथेही दैव आडवं आलं...,ट्रक बंद
पडला.तसाच बाळाला घेऊन जिवाच्या आकांताने शरद धावत
होता. भिवंडी च्या सरकारी दवाखान्यात पोहचे पर्यंत रात्रीचे
दीड वाजले,बाळाला डॉक्टरांनी दोन -तीन इंजेक्शन लावून सलाईन लावलं.पण आता त्याच अंग नीळ पडत चाललं होतं..
आकडी यायला लागली होती.
डॉक्टर बोलले पुढे ठाण्याला। न्यावे लागेल......
,अम्ब्युलन्स देतो.शरद च्या डोळ्या समोर अंधारी येत होती...
शेजाऱ्यांनी पुढाकार घेऊन होकार दर्शवला.अम्ब्युलन्स ही आली.पण....फार...वेळ..झाला होता.बाळा सर्वांना सोडून गेला होता."
--- प्रसंग खूपच धक्कादायक होता. ऐकून आम्ही सुन्न झालो होतो. पण आधी दोन दिवस बाळ का साप चावला ..साप .. चावला ..अस.किंचाळत होता....?हे गूढच वाटलं। बाळाची आई
शून्यात गेली होती.बरोबर गेलेल्या दोघी सांगत होत्या की शारदा
एकदम शॉक मध्ये गेलीय रडली ही नाही सुन्न बसून आहे.
..
वरील मजकुरात शरद च नाव सोडूनआणि गावाचं नाव
नक्की आठवत नाही.बाकी सर्व शतप्रतिशत खर आहे.
घ