पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

एक रमणीय सफर

एक रमणीय सफर- सत्तू भांडेकर

          ती आणि मी म्हणजेच आम्ही बालपणीचेच मित्र. बालपणापासूनच एकमेकांत रमायचे, एकमेकांसोबत खेळायचे, बागळायचे. पण त्या बालमनास प्रेमाची जराही जाणीव नव्हती. आम्ही मात्र आपल्याच जगात मुक्त वावरायचे, मनसोक्त विहारायचे. माझ्याशिवाय तिलाही करमत नसायचं कदाचित आणि मलाही तिच्याशिवाय. वाढत्या वयासोबत आमच्या ह्या मैत्रीची वीण घट्टच होत गेली. यात कधीच दुरावा आलेलं मी पाहिला नाही. रुसवे फुगवे असायचे मात्र ते एकदम क्षणिकच. एकमेकांना मनविण्यासाठी कधीही दुसऱ्या कुणाची गरज भासली नाही. आमच्या मैत्रीचं विश्व अजूनच व्यापक होत गेलं. तिच्या आणि माझ्या वयात फार तफावत नव्हतीच आणि विचारात पण. विचारही जुळायचे आमचे. ती मात्र जसजशी मोठी होत गेली तसतसं मी पण तिच्यात गुंततच गेलो. वाढत्या वयासोबत मैत्रीची वय पण वाढतच होती आमच्या. मात्र या वाढत्या वयानी काही बंधनंच लादत गेले नकळत आमच्यावर. बालपणात हातात हात घालून मिरवणारे आम्ही एकमेकांत अंतर पाळू लागलो हे मात्र तेवढंच खरं. अंतर मनात नव्हतंच कुठलंही पण सामाजिक जाणिव मात्र आड येत होती मैत्रीत आमच्या. एकमेकांत रमणारे आमचे मन मग नकळत पुस्तकांत रमू लागले. एकमेकांची ओढ असलेल्या मनाला नकळत शाळेची ओढ लागलेली. या शालेय जीवनानी मात्र आमच्यात दुरावाच आलेला. मनात मात्र नव्हताच कुठलाही दुरावा. ती वेगळ्या शाळेत शिकू लागलेली आणि मी वेगळ्या. शालेय अंतरांनी आमच्यातील अंतर वाढतच चाललेले. शरीरानं दूर असलो तरी मनानं मात्र जवळच होतो एकमेकांच्या. एकमेकांशिवाय न राहणारे आम्ही मात्र मग आपापल्याच जगात रमू लागलो, ते पण एकमेकांशिवाय. मी मात्र मैत्रीच्या जगात तिलाच शोधत असायचा. तिच्याच आठवणीत रमायचा. ती माझ्या आठवणीत रमायची की नाही ते मात्र कुणास ठाऊक.
             तिची माझी भेट शालेय जीवनात अवचितच व्हायची. मी मात्र त्याच भेटीकरिता आसुसलेलं असायचं. तिलाही मात्र माझी भेट होताच विशेष आनंद वाटत असायचा, हे मी तिच्या डोळ्यांत बघायचा. आणि मला पण खूप बरं वाटायचं. तिचे डोळे मला मला बघताच सुखावूनच जात असायचे. तेव्हा ती जेमतेम सोळा वर्षाची असावी. 'सोळावं वरीस धोक्याचंच' तिच्यासाठी नि माझ्यासाठी पण. तिला या वयात प्रेमाची चाहूल लागलेलीच. अन् तिच्या जगात मग रान माजवू लागले प्रेम वारे. मला तर ती लहानपणापासूनच आवडत होती. आमची ही भेट म्हणजे दोघांकरिताही इक सुखद धक्काच होता. मी मात्र तिला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देत होतो. ती मात्र मला दुसरी कोणी आवडते का...? याची चौकशी करण्यात व्यस्त. बालपणीचे दिवस ती पण विसरली नव्हतीच. आणि म्हणूनच की काय...? पण ती मुक्त सैर करीत होती माझ्या जगात. तिच्या वागण्यात कसलीही लाज नावाची गोष्ट दिसत नव्हतीच. बालपणीची 'ती' आज ती दिसत नव्हतीच. ओठांत नशा अन् डोळ्यांत धुंदी दिसत होती तिच्या. तिचे मादक हावभाव बघून तर क्षणभर वाटलं मला पण धुंद व्हावं नशेत हिच्या. पण सावरलो मी जरा स्वतःला.
           अधूनमधून आमची भेट ठरलेलीच असायची. अशीच एक भेट ठरलेली आणि मग भेटायचं ठरलं आमचं. तेव्हा तिची दहावी झालेली होती. मला तर ती हविहविसीच होती. ठरलेल्या ठिकाणी आम्ही दोघेही निर्धारित वेळेत पोहचलेलो. ती तेव्हा जरा जास्तच सुंदर दिसत होती. मोकळे असलेले केसांचे रान तिचे मला क्षणात मोहून घेतलेले. तिच्या अंगावरील शिवलेस हाताचा सलवार तिच्या मादकपणात अजूनच भर घालत होता. तिच्या अंगावरील कपड्यांची ठेवण भावत होती राहून राहून मनाला. तिच्या खांद्यावरील ओढणी तर छेदच घेऊ लागली मनाचा खोलवर. मी मात्र स्वतःला सवरतच तिला न्याहाळू लागलेला. तिच्या नजरेचा तिर मात्र घायाळच करत होता मला. ती मात्र स्वतःसोबतच मला पण सावरत सुरू केली मग खेळ शब्दांचा. बोलत बोलता तिने नकळत जागवल्या जुन्या आठवांना. त्या आठवांचा पाऊस जोर धरू लागला, आणि पाहता पाहता चिंब चिंब भिजवला त्या साठलेल्या जुन्या आठवणीत. तरी मात्र तिच्या डोळ्यात प्रेमाचा पाऊस साठतांना दिसत होता. तिला मी बालपणापासूनच आवडत असावा, असंच काहीसं तिला बघून जाणवू लागलं मला. बोलता बोलता मी सुद्धा व्यक्त होत होतो. तिला मात्र हवं असलेलं मला अजून तरी बोलता आलं नव्हतं. मैत्रीला प्रेमात बांधतांना जरा घाबरतच होता माझा मन. मी मात्र नकळत तिला लग्नाची मागणी घातलेला. ती सुद्धा बावरलीच बरं का...! माझी मागणी बघून. प्रेम व्यक्त करणं जमत नसणार प्रत्येकालाच, आणि मी पण त्यातील एक. ती मात्र काहीशी सुखावलेलीच दिसत होती. पण माझ्या मागणीला होकार दर्शविणे जमलं नसेल तिला पण. आणि म्हणूनच ती मात्र माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यात वेळ वेळ घेत होती. बराच वेळ आम्ही एकमेकांसोबत घालवला होता. मन थोडं भीतीनं थरथरतच होतं. ती मात्र काहीच न बोलता माझ्या जवळ आलेली. वाटत होतं मला पण घट्ट पकडावं मिठीत तिला आणि चुंबून काढावे तिचे मृदुल कोमल अधर पाकळ्या. मात्र मी स्वतःला धिरच देत होतो, ' नको आता थांब जरा'. तिनं मात्र कसलाही विचार न करता आणि वेळ वाया न घालवता घट्ट पकडली मिठीत मला. हा दृश्य म्हणजे शब्दांच्या पलीकडे जाऊन तिने खेचलेला अप्रतिम असा षटकारच होता. मी मात्र जरा घाबरलेलाच. तिचं स्पर्श मला सुखद धक्काच दिलेला होता.
             दिवस मावळतीला आलेला. गर्द हिरव्या वनराईवर सावळी सांज आपलं प्रकाश पेरत होती. सावळ्या रंगात सकल सृष्टी यौवनात पदार्पण केलेलीच भासत होती. पाहता पाहता साऱ्या आसमंतावर धुसरसा काळोख दाटत होता. आमची मिठी मात्र सैल न होता अजूनच घट्ट होत होती. पाखरे आपल्या घरट्यात परतून किलबिलाट करीत होते. माझे ओठ मात्र तिच्या लावण्याचा आस्वाद घेण्यात व्यस्त होते. हात तिच्या केसांच्या बटांत विसावा घेत होते. तिच्या केसांच्या मोकळ्या बटा नकळत मला छेडत होते. मी मात्र तिच्या उबदार मिठीत पहुडलेला. तिचे मृदुल कोमल अधर पाकळ्या माझ्या सर्वांगावर विराजमान झालेल्या बघून मी मात्र स्वतःला हरवूनच बसलेला. अंधार मात्र अजूनच दाटत होता. दाटलेला काळोख दूर सारण्या चांदण्यांनीही आरास मांडलेली. चांदण्यांच्या मंद स्मित प्रकाशात तिचे लावण्य अजूनच खुलून दिसत होते. अंग चिंब चिंब भिजलेच दिसत होते. मिठीतील उबेमुळंच असणार ते. तिच्या चिंब भिजलेल्या अंगाला अजूनच अंग भिडत होता. तो तिलाही हवाहवासाच होता बरं का. मी तिच्यात पूर्णतः रममाण झालेला, ती पण तेवढ्याच उत्सुकतेनी त्या सुखद क्षणांचा आस्वाद घेण्यात मग्न झालेली. तिचे हात मला अजूनच घट्ट पकडत होते...आणि मी पण तिचे अंग नि अंग टिपण्यात तेवढंच मग्न झालेला.
              या शरीर सुखाच्या सुखद क्षणात जरासा मी पण थकलेलाच अन् ती पण. नकळत मिठी सैल होऊ पाहत होती. थंडगार वारे अलवार छेडत होते तिला आणि मला पण. ती मात्र माझ्या हृदयावर डोकं टेकून जरा निवांतच बसली. मी पण दमलेल्या शरीरास जरा अराम देऊ लागलेला. ती मात्र त्या सुखद क्षणांनी काहीशी सुखावलेलीच दिसत होती. हव्याहव्याशा असलेल्या क्षणाची तिला प्रत्यक्षात अनुभूती लाभलेली होती. तिच्या ओठांवर मंद स्मित हास्य विराजमान झालेले दिसत होते. हव्या असलेल्या व्यक्तीसोबत साजरा केलेला हा आनंद सोहळाच होता जणू तिच्यासाठी अन् माझ्यासाठी पण. याच क्षणी आमच्या मैत्रीच्या घट्ट बंधनाचे रूपांतर प्रेमाच्या बंधनात झालेले होते. हा क्षण आम्हा दोघांसाठी पण अनमोल क्षणांपैकी एक होता. आम्ही आज एकमेकांत पूर्णतः सामावलो होतो. हा क्षण म्हणजे आमचा मैत्रीच्या जगा पलीकडचा अनोखा प्रवासच होता.
             प्रेमाच्या जगातील प्रवास हा सर्वानाच हवाहवासा असलेला. आम्ही मात्र त्यात प्रत्यक्षात गुंतलेले. ती पण तिच्या शैक्षणिक प्रांतात आपला दबदबा निर्माण करू लागलेली आणि मी पण. आमचं प्रेम शिक्षणात कधीच आड आलं नाही आणि आम्ही त्याला आड येऊ पण दिलं नाही. मात्र त्याच प्रेमानी आज आम्हाला जीवनाच्या एक अत्युच शिखरावर विराजमान केलेलं बघून आनंदाला पारावार उरत नाही. ती आणि मी म्हणजेच आमच्या आयुष्याचा एक सुखद क्षणच. प्रेमाच्या जगात पण एकमेकांच्या दूरच राहत होतो आम्ही. महिन्या दोन महिन्याला व्हायची भेट आमची. आज मात्र कायमस्वरूपी एकमेकांसोबत, एक रमणीय सफर तिचं नि माझं.
             
सत्तू भांडेकर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू