पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सोना चा लाडका उंदीर

*सोना चा लाडका उंदीर*


रात्री 9 वाजता सोना नेहमीप्रमाणे  ,आजी कडे गोष्ट ऐकण्यासाठी आजी जवळ झोपली, आजीला माहित होते की सोना फक्त मिकु,उंदराची गोष्ट ऐकते कारण उंदीर  तिच्या लाडक्या गणपतीचे वाहन आहे ,अणि, दरवर्षी तोच बाप्पाला आपल्या घरी आणतो।आजी सोनाला म्हणाली, आज मी तुला "पतंगाची गोष्ट" सांगणार आहे. सोना म्हणाली , नाही मी फक्त मिकु  उंदीर ची ऐकते ना आजी? मला तीच ऐकायची आहे।

मग कथा सुरू झाली. आज तुझा छोटा उंदीर विचार करत होता की आई सांगुन गेली आहे, आज खूप थंडी आहे, बाहेर जाऊ नकोस, तुझ्या मित्रांना इथे घरीच बोलावून घे खेळण्या साठी,  उंदराने चिकू आणि पिनू या उंदीर मित्रांना घरी बोलावले ,आणि ते खेळायला लागले  धावणे ,उड्या मारणे, पण थोड्याच वेळेत कंटाळले  , चिनू म्हणाला मित्रा, आज मी उंदीर मीनूला येताना पाहिलं,  ती  खुपच रागाने  एक जुन्या जाळ्याचे तुकडे  कुरडत होती. अणि रडत होती.  मीनू ची - चिकू , आणि पिनू बरोबर पण मैत्री आहे. तिला कशामुळे राग आला असेल? असा विचार करून तिघे मित्र , मीनूला शोधत बाहेर आले आणि मीनूला ला शोधत  तिच्या  पर्यन्त पोहोचले, मित्रांना पाहून मीनू जास्तच  रडूच लागली। मिकू च्या खिशात चॉकलेट होते, त्याने ते मीनूला खायला दिले, आता मीनूचा रागही शांत झाला होता, म्हणून चिनूने तिला तिच्या रागाचे कारण विचारले, मीनू म्हणाली आज मला खूप राग आला आहे, कारण आता आपल्या घरात कोणी येत नाही. आम्हाला  कोणी बोलावत नाही, आणि आपले गणपती बाप्पा  सुद्धा सोडून गेले  ,ते कुठे जातात तेच कळत नाही, घरातही सर्वांना बाप्पाची माहिती नसते, आई म्हणते ते येतील - पण कधी?

अरे मग तू माझ्या घरी का नाही आलीस, आम्ही सगळे खेळत होतो पण तुझ्याशिवाय खेळ काही जमलाच नाही  चल आता आपण सर्व  जण खेळू, सगळे एकत्र बोलले तेव्हा मीनू ही रडायचे विसरली, सगळे पुन्हा खेळू लागले.पळापळी , उड्या, या खेळातसगळ्यांना खूप मजा आली, मिनू म्हणाली अरे मला आठवलं आज माझ्या दादानी ,घरी आपल्या साठी खायला खूप खाऊ ठेवला होता , चला सगळे मिळून फस्त  करुया. सर्वजण धावत धावत मीनूच्या घरी पोहोचले, अरे वाह मीनू, हा तर खूप मस्तच नाश्ता  आहे, आणि सर्वजण आनंदाने खाउ लागले । मिकू नारळाच्या तुकड्या ला कुरडत  होता, चिनू कडे गुळाचा खडा होता, मीनू बदाम खात होती,  अणि पिनूच्या हातात खजूर होते , सर्वजण मस्त पैकी नाश्त्याचा आस्वाद घेत होते, तेवढ्यात उंदीर म्हणाला, मित्रांनो लवकर संपवा, बाहेर कोणी ढोलताषे वाजवत आहे , चला बाहेर पाहुया, पण मिनू म्हणाली  नाही, आधी पूर्ण नाश्ता करावाच लागेल।  तेव्हा सर्व  नाश्ता संपताच सगळे बाहेर पळू लागले ,मग मीनू जोरात म्हणाली - हे काय? हे  कोण साफ करणार सगळं चला !  सर्वानीं मिळून स्वच्छ केले ,मग. सर्वजण बाहेर आल्यावर समोरून ढोल-ताशांचा आवाज येत असल्याचे दिसले.

ते पाहून मिकू उंदीर म्हणाला - "मित्रांनो,  हे लोक तर मोरयाचा नाद करत ढोल वाजवत आहे म्हणजे ? अरे ! मित्रानो चला, लवकर  हे तर आपल्या लाडक्या  गणपती बाप्पा नां घ्यायला  जात आहेत!  आपल्या  शिवाय गणपती  बाप्पा  जाणार कसे ?  चला चला लवकरआंघोळ करून मस्तपैकी तैयार व्हा ,आणि आपल्याच गणपती बाप्पाला अभिमानाने नमस्कार करूया. आपल्याच पाठी वर बसुन चलणार न  सगळ्यांच्या घरी! आणि सगळे मित्र घरी पळत सुटले त्यांच्या गणपती बाप्पाला आपल्या पाठीवर बसवायला । "सुसज्ज होउन बाप्पांच्या जवळ अगदी ऐटीत बसले "।

मिरवणूक येतच राहिली आणि बाप्पाही घरोघरी,परिसरात,फॅक्टरीत,ऑफिस मध्ये  सर्वांना कडे उंदरान वर शोभीवन्त होउन  !! प्रत्येका कडे त्यांचे स्वागत करण्यात येत होते।

सगळी कडे फक्त "गणपती बाप्पा मोरया" चा नाद होत होता ,आणि उंदीर आणि त्याचे सर्व मित्र त्यांच्या लाडक्या बाप्पासोबत लाडू, मोदक,पेढेआणि इतर अनेक प्रकारची मिठाई चाखण्यात मग्न झाले। आजीनी सोनाला विचारले - छान वाटली का कथा? पण नेहमी प्रमाणे   सोना  तर कधी  झोपी  गेली आजी  ला कळलेच  नाही, मग आजी पण झोपुन गेली  ।।


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू