पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

परिवर्तन

" परिवर्तन "

परिवर्तन सृष्टीचा नियम आहे . तसा या नियमाचा आपल्या जिवनावर खुप मोठा परिणाम होत असतो . असा परिणाम आपल्या जिवनात आमुलाग्र बदल घडवुन आणतो . या बदलाने संपूर्ण जिवन बदलून जाते . हा बदल हवाहवा सा वाटतो म्हणतात ना " दाग अच्छे है  " असच काहीस झाल .. नव्हे घडल...

प्रसाद तसा घरात धाकटा . मोठा श्री ; दोन बहिणी  आणि आई वडील अस छानस सुटसुटीत कुटुंब. प्रत्येकाने हेवा करावा अस प्रत्येकाच व्यक्तीमत्व . आईवडील दोघेही धार्मिक वृत्तीचे ते नेहमी त्याच्या अध्यात्मीक कार्यात कार्यरत रहायचे . वडीलांचा चांगला अभ्यास एखादया अध्यात्मीक विषयाचा नेहमी त्यांची चर्चा सर्वांशी होत असे स्वभाव मनमिळावू त्यामुळे प्रत्येक जण काहीना काही विचारण्या साठी नेहमी घरी येत असत . घरात नेहमी वर्दळ असायची . ही वर्दळ दिसन दिवस वाढत च चालली . वडीलांच्या सेवानिवृती नंतर जाणारे येणाऱ्याची संख्या वाढली . घरी येणार्या प्रत्येकाचे आगत स्वागत तितक्याच आगतिक पणे आई करत असे . येणारा कधीच रिकामा जात नव्हता कधी चहा तर कधी खायला आई त्यांना देत असे त्यामुळे आईआणि वडील हे दोघेही लक्ष्मी नारायणाचा जोडा थोडक्यात काय तर मेड फॉर ईच अदर अस जोडा आईला तर सर्वजण अगदी देवीची उपमा सर्वजण दयायचे कारण डोक्यावर भरगच्च कुंकवाचा टीळा चेहर्यावर एक वेगळेच ते ज

प्रत्येकाचे हासुन स्वागत करण्याची वृत्ती कोणाच्या विषयी वैर भावना मनात कधीच नव्हती शत्रुलाही आपलेसे करण्याच्ची वृत्ती मुळे एक आनंदी वृत्ती त्यामुळ एक वेगळेच समाधानाचे तेज चेहर्यावर झळकत होते .

असे सुखी आणि समाधानाने तृप्त असणारा परिवार. मोठ्या मुलीचे लग्न झाले मोठ्या धुमधडाक्यात लग्नसमारंभ पार पडला . मोठ्या मुलीला नागपुरला दिले त्याठिकाणी सुद्धा सर्वकाही व्यवस्थीत होते  

प्रत्येक जण आपआपल्या कामात व्यस्त . असत त्यातच प्रसादला स्थानिक सोसायटी मध्ये जॉब मिळाला . हा जॉब प्रसादला श्री च्या सहकार्याने मिळाला . पगार कमी होता परंतु गरजपूर्ण करणारा होता

श्री वार्ताहार म्हणुन काम करत होताच लेखन ही करायचा दैनिकात मासिकात दिवळी अंकात त्याचे लेखन प्रसिद्ध व्हायचे

आकाशवाणी दूरदर्शनवर श्रीचे कार्यक्रम होत असत . त्याचे मानधनही चांगले मिळत असे .

प्रत्येक जण आपआपल्या क्षेत्रात काम करत होते . गावात लौकिकही चांगला होता . सर्वत्र आनंदी आनंद होता . आनं दाने दिवस जात होते . आणि अचानक एक दिवस आला....      

प्रसाद पळून गेला पळुन जाउन लग्न " केले"

त्या बातमीने संपूर्ण घर नव्हे तर संपूर्ण एरिया हादरला अस कस झाल? एक ना नाना प्रश्न समोर ठाकले इतक्या चांगल्या घरात घरातील एवढे चांगले वातावरण असताना प्रसादने असे वेगळे पाउल का उचलले काही कळना

आईवडील तर सुन्न झाले..

आईने तर धसकाच घेतला..

न भुतो भविष्यती...

अस घडल होत घराण्यात अस पाउल आज पर्यंत कोणीही उचलल नाही...

मग आताच अस काय घडल?

असे एक नाही अनेक प्रश्नाच काहूर मनात उठायला लागले मन अस्वस्थ व्हायला लागले .

श्रीआणि त्याचे वडील पोरगा कुठे गेला म्हणुन पूर्ण गावात चौकशी केली चौकशी करताना सुद्धा नाना प्रश्नोचा भडीमार सोसावा लागला उन्हातान्हात श्री आणि त्याचे वडील गरगर फिरले कोणी काही सांगायला तयार नाही कोणाला काही माहितीच नाही तर सांगणार काय?

अखेर . एका जणानी सल्ला दिला प्रसाद च्या मित्रा कडे चौकशी करा म्हणजे माहिती मिळेल..

हा सल्ला मानुन मित्राकडे

चौकशी करायला आम्ही गेलो तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अनुभव आले ...

प्रत्येकाकडे गेलो तर कोणी माहिती नाही काही कल्पना नाही असे म्हणुन वेळ निभावत होते

तर कुणी कुत्सीत पणे बघत

आमची वल्गना करत होते

तर कोणी कुत्सीत पणे बोलत होते नव्हे हासत सुद्धा होते

सर्वत्र फिरून अखेर सायंकाळी आम्ही घरी आलो ..

दिवसभर ना पाणी नाकाही

वणवण फिरलो घरी आल्यावर जाणवल कि आपल्याला जाम तहान आणि भुक लागलेली आहे त्या दिवशी घरात स्वयंपाक झाला नहता प्रत्येक जण उपाशी होता

मोठा भाऊ म्हणुन माझी ही अवस्था होती तर वडीलाची काय अवस्था झाली असेल याची कल्पना न केलेली बरी

सवेत्र फिरल्यावर आम्हाला एवढेच कळले कि प्रसादने त्याच्या ऑफीस मध्ये असणारी मुलगी तिला सोबत घेऊन तो परगावी निघुन गेला त्या ठिकाणी त्यानी लग्न करायचे ठरवले आहे तेही रजिस्टर पद्धतीन .

दोन चार नव्हे तर चक्क आठदिवस आमचे असेच विचारा विचारात मनाची घालमेल होत कसे बसे निघाले

अखेर ती दोघ आठदिवसानी घरी

आले दोघानी लग्न केले होते

घरात गोंधळ उडाला विचारांचा

वडीलानी प्रसाद ला अगदी निष्ठुन सांगीतले तुला या घरात जागा नाही तु घराबाहेर जा या घराशी तुझा कोणताच सबेध यापुढे राहणार नाही

असे सांगत असताना आईचे आणि वडीलाचे डोळे पाणावले होते वडीलाना मी आयुष्यात पहिल्यान्दाच रडताना बघत होतो त्याना रडताना बघुन मलाही रडायला यायला लागले...

कोणाची दृष्ट आमच्या घराला लागली कोणास ठाउक?

पण जे काही होउन राहिले होते ते बरोबर होत नव्हते एवढ मात्र खर

प्रसादने सुद्धा रागारागाने आदळ आपट करत घरातील सामान सोबत घेतले आणि घराबाहेर पडला...

आईची अवस्था तर फारच केविलवाणी झाली होती . ती फक्त रडत होती..

वडील सुद्धा रडत होते

मला सुद्धा रडण आवरत नव्हते

माझी फार विचित्र अवस्था झाली होती कोणाकडे बघाव हेच कळत .. फार विचित्र अवस्था झाली होती...

पण म्हणतात ना कोणतेच दिवस कायम रहात नाही सुखाचे दिवस भोगायचे आणि दुःखाचे दिवस कंठायचे असेच झाले . हे जिवन चक्र आहे सुख दुःख येतच राहतील झालेही तसेच अस म्हणतात कि विरहात प्रेम अधिक वाढते काही काळ गेल्यानंतर सर्व काही सुरळीत झाले प्रसाद आणि त्याची सौ दोघेही जवळपास आठ महिन्यानी घरी आले आई वडीलांच्या पाया पडले आणि

" आम्ही चुकलो" अस म्हणुन माफी मागितली आई ती आई च असते ना 

आई हे अस न्यायालय आहे कि त्या ठिकाणी सर्व गुन्हे माफ होतात

झालही तसच सर्वानी माफ केल 

घरात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण तयार झाल

घराला घरपण आल

आनंदाचा स्त्रोत पुन्हा घराला प्राप्त झाला जणु ही परिवर्तनाची नांदीच तर नाही 

सर्व जण आनंदात वातावरण पुन्ही आनंदी आनंद

पूर्वीचे सुख पुन्हा वापस आले .

हे असच असत माणुस ठरवतो एक आणि होते एक .

एक हसत खेळत घराला आलेली मरगळ काही दिवसानी पुन्हा एकदा उत्साहात आणि आनेदात

परिवर्तीत झाली 

परंतु हे सर्व घडण्यासाठी सर्वाना

एका दिव्यातून जावे लागले एवढेच नव्हे तर सहनशिलता

वाढवावी लागली शेवटी माणुस आहे रा ग लोभ तिरस्कार

हे सर्व विकार लागु होणारच

परंतु आपल मन मोठ असायला हव मन मोठ असल कि त्यात सर्व काही सामावून जाते झालही तसच प्रसाद जेव्हा घरी आला तेव्हा घरात खुप आकाड तांडव झाले असते पण हे सर्व टाळण्यासाठी वडीलानी घेतलेला निर्णय हा किती योग्य होता हे काही दिवसानी सर्वाना कळला होता वास्तविक वडीलानी जेव्हा प्रसादला घर सोडाचला सांगीतले तेव्हा त्यांना किती वेदना झाल्या असतील . दुःख झाले असेल परंतु त्यांनी पुढ्चा विचार करून घेतलेला कठोर निर्णय खरच कौतुकास्पद असाच म्हणायला हवा कारण आज घेतलेल्या निर्णयामुळे सर्वांना काहीच काळ त्रास होणार आहे जन्माचे वैर राहणार नव्हते . हे ते जाणुन होते कोणताही बाप नेहमी आपल्या मुलाच्या हिताचे निर्णय घेत असतो . मुला प्रती असणारे प्रेम ओढ त्यामुळे थोडीच कमी होणार होते उलट भविष्यातील घटनेचा

आढावा त्यानी घेतलेला होता काही अप्रिय घटना घडू नये म्हणुन घेतलेला कटु निर्णय किती गोड होता हे नेतर सर्वाना कळले .

आईची अवस्था तर फारच विचित्र झाली होती काहीच करू शकत नव्हती शेवटी माय माउलीच ती लेकरासाठी तिचा जिव तुटणारच तसच झाल .

प्रसाद घरी आला बायकोलाही घेउन आला सुनेला घरी आणले सुनेच आगत स्वागत करण्यात आले नव्याची नवलाई पुन्हा अनुभवायला आली

लहान मुलच ती आईवडीलाना मुल लहानच वाटत असतात ती कितीही मोठी झाली तरी तसच आईवडीलाना वाटल असाव त्यानी तोच विचार केला असावा जीवनातील अप्रिय घटना टाळायच्या असतील तर नेमकि पावल उचलता यायला हवीत कदाचीत यामुळ भविष्यातील अनेक अप्रिय घटना निश्चित टळु शकेल यात वादच नाही

कदाचित हिच परिवर्तनाची नांदी ठरल्याशिवाय राहणार नाही


    श्रीकांत धारकर

    बुलडाणा

९४२२१८४३३६

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू